Join us  

कोरोना मरणारच : मुंबईकरांसाठी ‘जम्बो फॅसिलिट’; पण घराबाहेर पडू नका...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 3:05 PM

नव्याने तयार केलेल्या निरनिराळ्या सुविधा संस्थामार्फत (जम्बो फॅसिलिटी) निर्माण होणा-या अतिरिक्त खाटांच्या क्षमतेमुळे ३१ मे पर्यंत यामध्ये आणखी वाढ होईल

मुंबई : डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर, (खासगी व सरकारी) मिळून आरोग्य संस्थांमधलया एकत्रित खाटांची संख्या ही ६ हजार १३० आहे. नव्याने तयार केलेल्या निरनिराळ्या सुविधा संस्थामार्फत (जम्बो फॅसिलिटी) निर्माण होणा-या अतिरिक्त खाटांच्या क्षमतेमुळे ३१ मे पर्यंत यामध्ये आणखी वाढ होईल. ऑक्सिजन पुरवठयासह उपलब्ध असलेल्या खाटांची सुविधाही यातून बळकट होईल. सर्व डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल आणि डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर मिळून १० हजार खाटापर्यंत क्षमता नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. अतिदक्षता खाटांची संख्या ५३५ असून, त्यांची संख्या १ हजारापर्यंत वाढविण्यात येत आहे. यासोबतच भर म्हणून खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम यांना त्यांच्याकडील उपलब्ध अतिरिक्त खाटांसह समावेश करण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी देखील मुंबईकरांनी लॉकडाऊन पाळावे. काम नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.मुंबई महापालिकेच्या २४ विभागांत आरोग्य स्वयंसेविका, स्थानिक स्वयंसेवक हे झोपड्यांत रोज घरोघरी दाखल होत सर्वेक्षण करत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, १ हजार पथके रोज ६ ते ७ लाख लोकांपर्यंत पोहचत आहेत. या पथकांनी शोध घेतलेल्या व्यक्तींना दवाखाने, कोरोना काळजी केंद्रामध्ये संदर्भित केले जाते. घरांच्या सर्वेक्षणाचे लक्ष्य गाठल्यानंतर फेरसर्वेक्षण केले जाते. अशा पद्धतीनुसार आजवर ५८ लाख १४ हजार ३४० घरांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. त्यातील ७ हजार ४४७ संशयितांना संदर्भित करण्यात आले आहे. रुग्णांच्या अती जोखीम संपर्कातील  ५२ हजार ७९८ व्यक्तींचादेखील शोध घेण्यात आला आहे. यापैकी ३६ हजार १६७ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.  ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील ऑक्सिजन तपासणीसह विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत १० लाख २५ हजार ६२ घरापर्यंत पोहचत जवळपास १ लाख ६८ हजार ६७८ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार २७९ ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी आढळली. त्यांना लगतच्या रुग्णालय, दवाखने येथे संदर्भित करण्यात आले.--------------------झोपड्या आणि प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. आजवर ३५७ शिबिरे घेण्यात आली. त्यातून १८ हजार ६४३ अति जोखीम गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या. ५ हजार १८८ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यातील ६८३ प्रकरणे बाधित आढळली. बाधितांना विलगीकरण् करून उपचार करण्यात येत आहेत.--------------------एप्रिल २०२० मध्ये सर्व सरकारी डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल मिळून १ हजार ९६० खाटा उपलब्ध होत्या. त्यांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या ३ हजार ६५७ झाली आहे. सद्यस्थितीमध्ये सरकारी आणि खासगी अशा मिळून एकूण ३८ रुग्णालयात ५ हजार ३० खाटा उपलब्ध आहेत.--------------------ज्या रुग्णांना मध्यम स्वरुपात कोरोना बाधा किंवा इतर आजारांसह कोरोना बाधा आहे. त्यांना डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल करता येऊ शकते. सद्यस्थितीमध्ये १९ समर्पित डेडीकेटीड कोरोना हेल्थ सेंटर खाटांची एकूण क्षमता १ हजार १०० आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयांचा वाटा ८६८ आहे.--------------------पी. पी. ई. किटखाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेद्वारे यापूर्वी वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, असे असूनही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल व खाजगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जी खाजगी नर्सिंग होम, खाजगी रुग्णालये वा खाजगी दवाखाने अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर जी खाजगी रुग्णालये - नर्सिंग होम - दवाखाने सुरू होतील, त्यांना महापालिकेद्वारे पी. पी. ई. किट देण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.--------------------

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई