Join us  

Corona virus: सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:14 PM

दोन दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी  मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटाझर देण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश बंदी आणण्यात आली आहे. 

दोन दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी  मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटाझर देण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज मंदिराचे दरवाजेच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रक मंदिर ट्रस्टने प्रसिद्ध केले आहे.

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून देशातही कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दीची ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच मंदिराचे भाविकांच्या प्रती असलेले सामाजिक दायित्व लक्षात घेता भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. परंतु, सदर कालावधीत न्यासातर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत, मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना