Join us  

Corona Virus: कोरोनाच्या ११ रुग्णांत तीव्र लक्षणे नाहीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:12 AM

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला राज्याचा आढावा

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून प्रवास केलेल्यांना ‘क्वॉरंटाईन’ (वेगळ््या कक्षात ठेवणे) करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे, त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि ‘क्वॉरंटाईन’ची सुविधा तातडीने करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाºया कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत की नाही, याचाही प्रत्येक जिल्हाधिकाºयांनी आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर आॅपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.नागपूर विमानतळावर केवळ विदेशी प्रवाशांची तपासणीदेशांतर्गत विमानाने नागपुरात येणाºया प्रवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागपूर विमानतळावर विदेशातून येणाºया प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची चमू तैनात आहे. सर्वांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी होते आहे. विदेशी प्रवाशांची दिल्ली, मुंबई वा अन्य विमानतळांवर तपासणी होते आहे. त्यानंतर ते नागपुरात येत आहेत. चिंता न करता लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे वरिष्ठ विमानतळ संचालक एम. ए. आबीद रूही यांनी सांगितले.दर दोन तासांनी आढावा घेणारराज्यस्तरावर कोरोनाचा दर दोन तासांनी आढावा घेतला जाईल. चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते. त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी.सात देशांतून आलेल्यांचे १००% क्वॉरंटाईनमुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले, चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतून १५ फेब्रुवारीनंतर प्रवास केलेले व देशात परतलेल्यांना सक्तीने १५ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना द्याव्यात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सात देशांतून आलेल्या व येणाºया प्रवाशांचे १०० टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे. पुणे, मुंबई, नागपूर येथील क्वॉरंटाईनच्या सुविधेची माहिती महापालिका आयुक्तांनी तातडीने द्यावी. अन्य शहराच्या महापालिका आयुक्तांनीही संबंधित माहिती उद्यापर्यंत द्यायची आहे.प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करावाआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ७ देशांतून परतणाºया प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी व्यवस्था करावी.सर्व शासकीय कार्यक्रम रद्दयात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. सूचनांचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाई करा. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा. पुढील किमान १५ ते २० दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या.

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना