Join us  

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादाळामुळे मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या बंद, प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 7:31 PM

मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे.

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्या सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :तौत्के चक्रीवादळचक्रीवादळ