Corona Vaccination: ...अन् वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील लसीकरण ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:12 AM2021-04-18T06:12:13+5:302021-04-18T06:12:31+5:30

लसींचा तुटवडा, नवीन साठा मिळणार असल्याने आज होणार प्रक्रिया पूर्ववत

... Corona Vaccination halted at bandra-Kurla Covid Center | Corona Vaccination: ...अन् वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील लसीकरण ठप्प!

Corona Vaccination: ...अन् वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील लसीकरण ठप्प!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड केंद्रात शनिवारी लसींचा तुटवडा भासल्याने लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अचानक झालेल्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाले, परिणामी भर उन्हात लसीकरणासाठी रीघ लावलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. मात्र, रविवारी लसीकरण पूर्ववत होईल अशी माहिती केंद्राच्या अधिष्ठात्यांनी दिली.


काेराेना प्रतिबंधासाठी लसीकरण हा पर्याय असल्याने पालिका प्रशासनाने लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. मुंबईकरांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेहमीप्रमाणेच शनिवारी सकाळपासूनच वांद्रे-कुर्ला संकुल येथील लसीकरण केंद्रावर मुंबईकरांनी लस घेण्यासाठी भलीमाेठी रांग लावली हाेती. त्यामुळे या केंद्रावर मुंबईकरांची बरीच गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. नागरिकांचे लसीकरण करण्याचे काम येथे दुपारपर्यंत वेगाने सुरू हाेते. मात्र दुपारनंतर साठी संपला, त्यामुळेच रांगेत उभ्या असलेल्या बऱ्याच जणांना लस न घेताच माघारी फिरावे लागले.


मागील काही दिवसांत लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यात शनिवार-रविवारी हा ओघ अधिक असतो. लसीकरणासाठी मागणी तसा पुरवठा नसल्याने अचानक लसीकरण थांबवावे लागले; परंतु लसीचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असून, ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. शहर, उपनगरातील काही खासगी रुग्णालयांतही लसींचा अखेरचा साठा शिल्लक असून, नव्या साठ्याची गरज असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मुंबईला आज मिळणार ९५ हजार लसी
nमुंबई : कोविड प्रतिबंधक ९५ हजार लस डोसचा साठा रविवारपर्यंत महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे एकूण दोन लाख १० हजार लस डोसचा साठा असल्याने लसीकरण सुरू राहणार आहे. दरम्यान, शनिवारी काही केंद्रांवरील साठा संपल्यामुळे तिथे लसीकरण होऊ शकले नाही. तरीही दिवसभरात ५० हजार ७२५ नागरिकांना लस देण्यात आली.


nमहापालिका आणि सरकारी ४९ केंद्रे आणि ७३ खाजगी केंद्रांवर दररोज लसीकरण केले जात आहे. लसींचा साठा मर्यादित असल्याने केवळ ॲपवर नाव नोंदवलेल्या लोकांनाच लस देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १९ लाख ४१ हजार ८७८ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

१,११० नागरिक संस्थात्मक विलगीकरणात 
मुंबईत एप्रिल २०२० पासून आतापर्यंत चाळी व झोपडपट्टीमधील काेराेनाबाधित व संशयित रुग्णांपैकी एक लाख ५४ हजार ९२१ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात राहिले. सध्या लक्षणविरहित काेराेनाबाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या १,११० नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 
nशनिवारी दिवसभरात ४६ हजार ८५० लोकांना कोविशिल्ड, तर ३,८७५ लोकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. दरम्यान, महापालिकेकडे सध्या एक लाख १५ हजार लस डोसचा साठा शिल्लक आहे. यामध्ये आणखी ९५ हजार लसींचा भर पडणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

भायखळा, कुर्ला येथील क्षेत्रही प्रतिबंधित
nभायखळ्यात १४ आणि कुर्ला विभागात १२ चाळी आणि झोपडपट्टी विभाग प्रतिबंधित आहेत.
nकाेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे गरजचे असल्याचे आवाहन पालिका प्रशासनकडून करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात लसीकरण अधिक वेगाने करण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: ... Corona Vaccination halted at bandra-Kurla Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.