Join us

Corona Vaccination: मुंबईत चार दिवस लसीकरण बंद; थेट सोमवारी मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 19:02 IST

लसीकरण मोहीम मुंबईत वेगाने सुरु असून आतापर्यंत ९९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - लसीकरण मोहीम मुंबईत वेगाने सुरु असून आतापर्यंत ९९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त चार दिवस सुट्ट्या असल्याने लसीकरण मोहीम देखील बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर ४ ते ७ नोव्हेंबर २०२१ या कालावधी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस मिळणार नाही. 

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी ४२ लाख ६२ हजार ५१३ नागरिकांना लस मिळाली आहे. यापैकी ८८ लाख नागरिकांना पहिला डोस तर ५३ लाख ६३ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दिवाळीपर्यंत मुंबईत सर्व नागरिकांचा पहिला डोस मिळाले, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार आता पहिला डोस अद्यापही न घेतलेल्या एक टक्का नागरिकांचा शोध सुरु आहे. 

आतापर्यंत ६० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार फिरती वाहन सेवा सुरु करण्यात आली असून झोपडपट्टी व इमारतींमधील लसपासून वंचित नागरिकांना शोधून त्यांना डोस दिला जात आहे. सध्या महापालिकेकडे कोविड प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारी ८ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे. 

आरोग्य सेवक, फ्रन्टलाइन वर्कर्स - ७५३९२० 

ज्येष्ठ नागरिक - २०५६०१०

४५ ते ५९ वर्षे - ३५२६५५६

१८ ते ४४ वर्षे - ७८५४४६६

स्तनदा माता - १३०३४

गर्भवती महिला - २८५०

कोविशिल्ड - १२७८४९०२ 

कोव्हॅक्सिन - १४२३०५६

स्पुतनिक - ५४५५५ 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबई