Join us  

कोरोनाने गती मंदावली, आता गाडी रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 6:21 AM

हे वर्ष कोरोनामुळे अडचणीचे ठरले. दुर्दैवाने सात ते आठ महिने सरकारचे काम गतीने चालले नाही. कारण अनेक ठिकाणी लॉकडाऊन होता. आता पुन्हा नव्याने कामाची सुरूवात झाली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने आणि सगळ्यांना सोबत घेऊन सरकार उत्तमपणे चालवले आहे. विरोधकांना हीच खरी पोटदुखी आहे, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

एक वर्षाचा कारभार  तुम्ही कशा पद्धतीने बघता?हे वर्ष कोरोनामुळे अडचणीचे ठरले. दुर्दैवाने सात ते आठ महिने सरकारचे काम गतीने चालले नाही. कारण अनेक ठिकाणी लॉकडाऊन होता. आता पुन्हा नव्याने कामाची सुरूवात झाली आहे. पण या वर्षभरात लोकांच्या हाताला काम देणे, पोटाला अन्न देणे आणि जगण्याची उमेद देणे या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सरकार म्हणून आम्ही त्या समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.आघाडीतील समन्वयाचे काय?तिन्ही पक्षात शंभर टक्के समन्वय होता आणि आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्र काम करण्याचा अनुभव आहे. आम्ही शिवसेनेसोबत काम करताना देखील पूर्ण समन्वयाने काम केले आहे. मतभेद नाहीत, मात्र काही विषयांवरून चर्चा होते, प्रत्येक मंत्री आपल्या विभागाबद्दल आग्रह धरतो, त्याचा अर्थ आम्ही वाद घालतो किंवा आमच्यात भांडणे आहेत, असा काढणे पूर्णपणे चुकीचे आहे.

राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत जाईल अशी चर्चा आहे.असे कदापि होणार नाही. आपला पक्ष तुटू नये म्हणून भाजपला हे असे बोलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यांनी आमदारांना सत्तेचे आमिष दाखवून त्यांच्याकडे नेले. तेच आमदार आता त्यांना भंडावून सोडत आहेत. राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा विषयच येत नाही.विरोधी पक्षनेते म्हणून भाजपची 

भूमिका या वर्षभरात कशी होती?विरोधी पक्षाकडे गांभीर्य नाही. बिहार निवडणुकीसाठी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण लावून धरून महाराष्ट्राची बदनामी केली. एका मराठी उद्योजकाने केलेल्या आत्महत्येमध्ये देखील त्यांनी चुकीची बाजू घेतली. 

राज्यातील जनता विचारी आहे. ती बोलत नसली तरी या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत असते. भाजप ज्या विषयावर महाराष्ट्रात राजकारण करत होते, त्याच विषयांवर केंद्र सरकारची वेगळी भूमिका होती. लोक हे सर्व पाहत आहेत.  - जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडकोरोना वायरस बातम्या