गायक बप्पी लहरी यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:06 IST2021-04-02T04:06:23+5:302021-04-02T04:06:23+5:30

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांची काेरोना चाचणी ...

Corona to singer Bappi Lahiri | गायक बप्पी लहरी यांना कोरोना

गायक बप्पी लहरी यांना कोरोना

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांची काेरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना ब्रीच कँडी या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बप्पी लहरी यांची मुलगी रेमा बन्सल हिने दिलेल्या माहितीनुसार, बप्पीदांनी सर्व प्रकारची काळजी घेतली होती. मात्र तरीही त्यांना काेरोनाची लागण झाली. वाढत्या वयाचा विचार करता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले. बप्पीदा यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याची विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १७ मार्चला बप्पी लहरी यांनी साेशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी काेरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी केल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे काेरोनाची लस घ्यावी, यासाठी चाहत्यांना आवाहन केले होते.

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरनंतर, संजय लीला भन्साळी, आमिर खान, कार्तिक आर्यन, मिलिंद सोमण अशा अनेकांना काेरोनाची लागण झाली.

Web Title: Corona to singer Bappi Lahiri