Corona obstructs doctor in Thane | ठाण्यातील फवारणी होणार बंद, पालिकेने थकविले ठेकेदाराचे बील

ठाण्यातील फवारणी होणार बंद, पालिकेने थकविले ठेकेदाराचे बील

ठाणे  : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. तसेच संपूर्ण शहरेच निजर्तुकीकरण केली जात आहेत. ठाण्यातही पालिकेच्या माध्यमातून सध्या शहराच्या विविध भागात ठेकेदारांच्या मदतीने फवारणीची कामे सुरु आहेत. मात्र फायलेरीया विभागात काम करणा:या ठेकेदारांच्या कामगारांना पगारच मिळाला नसल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे आता शहरात सुरु असलेली फवारणी बंद होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. दरम्यान कामगारांचा पगार मिळा

वा यासाठी संबधींत ठेकेदारासह कामागारांनी गुरुवारी फवारणी यंत्र घेऊन पालिका मुख्यालयासमोर आगळे वेगळे आंदोलन केले. 
    शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिका स्तरावर विविध स्वरुपाच्या उपाय योजन केल्या जात आहेत. तसेच शहरातील प्रत्येक रस्त्यांवर गल्लीतून फवारणी सुरु झाली आहे. परंतु आता फायलेरीया विभागातील ठेकेदाराच्या कामगारांनी गुरुवारी दुपारी महापालिका मुख्यालयात धाव घेऊन पगार मिळावा यासाठी आंदोलन केल्याचे दिसून आले. मागील आठ महिन्यापासूनचे पालिकेने आमचे बील थकविलेले आहे. ते बील मिळावे म्हणून मी वारंवार पालिकेच्या खेटा घालत आहे, मात्र पालिकेकडून बील अदा केले जात नसल्याचा आरोप यावेळी ठेकेदार शिला पाटणकर यांनी केला आहे. पालिका बिल देत नसल्याने आता कामगारांचे पगारही मला देणो शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता ठाणोकरांच्या सेवेसाठी मी कामगारांनाच या ठाणोकर जनतेकडून पैस मागण्यास सांगितले आहे, त्याच पैशातून डिङोल आणि औषध आणून आम्ही ठाणोकरांसाठी सेवा देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेच कामगारांना हॅन्ड ग्लोज नाही, मास्कही नाहीत, पालिका बीलही देत नाही, त्यामुळे बॅंकेचे हप्तेही थकले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेने यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणीही त्यांनी केली.


    अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाकडून कामगारांना अशी वागणूक देणो अयोग्य आहे, त्यांची बिले तत्काळ काढण्यात यावीत, जेणोकरुन फवारणीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यादृष्टीने पालिकेने विचार करावा असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Corona obstructs doctor in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.