Join us  

पश्चिम उपनगरात  कोरोनाचा आकडा पोहचला 228 वर; कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के. पश्चिममध्ये 46 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 2:59 PM

वांद्रे ते दहिसर पूर्व व पश्चिम भागात विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.आज पश्चिम उपनगरात  कोरोनाचा आकडा आता 228 वर गेला आहे. तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम या भागांचा मिळून  के पश्चिम वॉर्ड असून येथे कोरोनाचे 46 रुग्ण झाले आहेत.पी दक्षिण मध्ये 18 व पी उत्तर मध्ये 36 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्ड मधील कोरोनाने सेंच्युरी पूर्ण केली असून येथे आता कोरोनाचे 100 रुग्ण झाले आहेत.

वांद्रे ते दहिसर पूर्व व पश्चिम भागात विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते. पश्चिम उपनगरात गेल्या मंगळवारी कोरोनाचे 191 पॉझिटिव्ह रुग्ण होते,तर काल येथे कोरोनाचे 207 रुग्ण होते.तर पश्चिम उपनगरात आज  कोरोनाचे 228 रुग्ण झाले आहे.मात्र आजही नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कशी घालायची हा पोलिस यंत्रणा व पालिका प्रशासना समोर मोठा प्रश्न आहे.

के पश्चिम हा सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम पर्यंत पसरलेला मोठा वॉर्ड आहे.पालिकेच्या नकाश्यावर हा कोरोनाचा हॉट स्पॉट असून येथे कोरोनाचे तब्बल 46 रुग्ण आहेत.त्या खालोखाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्ड मध्ये कोरोनाचे 37 रुग्ण आहेत.तर मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरार पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्ड मध्ये कोरोनाचे 36 रुग्ण आहेत.

पालिकेच्या वॉर्ड विभागणी नुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व,एच पश्चिम, के पूर्व,के पश्चिम,पी दक्षिण, पी उत्तर,आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात.पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 46 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्या खालोखाल एच पूर्व मध्ये 37,पी उत्तर वॉर्ड मध्ये 36,एच पश्चिम मध्ये 19,के पूर्व मध्ये 30,आर दक्षिण मध्ये 20,,पी दक्षिण मध्ये 18,आर मध्य मध्ये 13 व आर उत्तर मध्ये 9 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 228 रुग्ण झाले आहेत.

रोज येथे वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, परिमंडळ 4 चे पालिका उपायुक्त रणजित ढाकणे,परिमंडळ 3 चे उपायुक्त पराग मसूरकर,परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यासह 9 सहाय्यक पालिका आयुक्त,9 वॉर्डचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र आपले 100 टक्के योगदान देऊन मोलाची भूमिका बजावत आहेत.तर मुंबई पोलिसांचे देखिल मोलाचे सहकार्य पालिका प्रशासनाला मिळत असल्याचे येथील चित्र आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई