कोरोनाचा विस्फोट कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:21+5:302021-04-02T04:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील आठवड्याभरातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा विस्फोट कायम असून, गुरुवारी पुन्हा ४३ हजार १८३ ...

Corona explosion continues! | कोरोनाचा विस्फोट कायम !

कोरोनाचा विस्फोट कायम !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील आठवड्याभरातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा विस्फोट कायम असून, गुरुवारी पुन्हा ४३ हजार १८३ रुग्ण आणि १०८ मृत्यूंची नोंद झाली. मागील काही दिवसांत राज्यात सातत्याने दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या नवा विक्रम रचत आहे.

यापूर्वी, २८ मार्च रोजी राज्यात २४ तासांत ४० हजार ४१४ रुग्णांचे निदान झाले होते. आता कोरोना रुग्णांची संख्या २७ लाख १३ हजार ८७५ झाली असून, मृतांचा आकडा ५४ हजार १८१ झाला आहे. सध्या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन लाख २५ हजार ९०१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९५ टक्के असून, मृत्युदर २ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ९३ लाख ५८ हजार ३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.०२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १५ लाख ५६ हजार ४७६ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर १५ हजार ८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे

पुणे ६४,५९९

मुंबई ५४,८०७

नागपूर ४८,८०६

ठाणे ४२,१५१

नाशिक ३६,२९२

पाच दिवसांत एक लाख ८२ हजारांहून अधिक रुग्ण

१ एप्रिल ४३,१८३

३१ मार्च ३९,५४४

३० मार्च २७,९१८

२९ मार्च ३१,६४३

२८ मार्च ४०,४१४

Web Title: Corona explosion continues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.