Join us  

कोरोनासाठी महापालिका झाली हायटेक; प्रत्येक अर्ध्या तासांनी खाटांची माहिती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:31 AM

वेब डाटा रिअल टाइम डॅशबोर्ड प्रशासनाकडून अपलोड

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाला प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करून घेण्यास आठ तासांचा कालावधी लागत आहे, तसेच आता काही उपलब्ध होत नसल्याची तक्रार येत होती. मात्र ही गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने आता मुंबईतील सर्व रुग्णालयांतील खाटांच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी वेब डेटा रिअल टाइम डॅशबोर्ड अपलोड केला आहे. त्यामुळे प्रत्येक अर्ध्या तासांनी उपलब्ध खाटांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

हेल्पलाइनमध्ये वाढ...

पालिकेच्या नियंत्रण कक्षात उपलब्ध असणाऱ्या १९१६ या क्रमांकावर मदत, मार्गदर्शन, खाटा, खाण्याच्या व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी दररोज साडेचार हजार कॉल येत आहेत. च्त्यामुळे काही वेळा अनेकांना प्रतीक्षेत राहावे लागते. त्यामुळे या हेल्पलाइनची क्षमता बुधवारपासून वाढवण्यात येणार आहे.

माहिती तात्काळ मिळणार

पालिकेच्या १९१६ या हेल्पलाइनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्याची सुविधा करण्यात आली आहे. मात्र अनेक वेळा हा हेल्पलाइन क्रमांक व्यस्त असल्याची तक्रार नागरिकांकडून येत होती. तसेच बाधित रुग्णांनी संपर्क केल्यानंतरही सुमारे सहा ते आठ तास रुग्णाला घेण्यास कोणी येत नसल्याची तक्रार येत होती. यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. मात्र हेल्पलाइन क्रमांक वाढविण्यात येत असून रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती तात्काळ मिळेल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई