विद्यापीठाच्या विद्यार्थी दरबाराला थंड प्रतिसाद
By Admin | Updated: January 28, 2015 00:55 IST2015-01-28T00:55:03+5:302015-01-28T00:55:03+5:30
पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल, हॉल तिकिटातील चुका अशा विविध कामांसाठी विद्यापीठात अनेक चकरा माराव्या लागणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने

विद्यापीठाच्या विद्यार्थी दरबाराला थंड प्रतिसाद
मुंबई : पुनर्मूल्यांकनाचे रखडलेले निकाल, हॉल तिकिटातील चुका अशा विविध कामांसाठी विद्यापीठात अनेक चकरा माराव्या लागणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मंगळवारी विद्यार्थी दरबार आयोजित केला होता. या दरबारात सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने हा दरबार थंड पडला होता. या दरबारात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचे होते, तर उर्वरित १४ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाने कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवन येथे मंगळवारी विद्यार्थी दरबार आयोजित केला होता. यामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि विभागप्रमुख उपस्थित राहणार होते. अनेक वर्षांपासून आपला प्रश्न मार्गी लागत नसल्याने जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणीही आपल्याला नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची विनंती केली. या दरबारात सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यामध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. या विद्यार्थ्यांसह सुमारे १८ विद्यार्थ्यांनीही या ठिकाणी हजेरी लावली. यापैकी पाच विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी सांगितले.
विद्यापीठात आयोजित होणाऱ्या या विद्यार्थी दरबाराबाबत विद्यार्थी प्रतिनिधींनाच विद्यापीठाने अंधारात ठेवल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला. (प्रतिनिधी)