मुंबईसाठी ‘विशेष समिती’वरून वादंग
By Admin | Updated: January 6, 2015 01:34 IST2015-01-06T01:34:00+5:302015-01-06T01:34:00+5:30
मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे़ मुंबई दिल्लीच्या दावणीला बांधण्याचा भाजपा सरकारचा घाट असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला़

मुंबईसाठी ‘विशेष समिती’वरून वादंग
मुंबई : मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे़ मुंबई दिल्लीच्या दावणीला बांधण्याचा भाजपा सरकारचा घाट असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला़ तर सभागृहात गोंधळ घालण्यासाठी काँग्रेसला ठेकेदाराने पैसे दिले असल्याचा खळबळजनक आरोप भाजपाने केला़
या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर संशय व्यक्त होऊ लागल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणाची हिंमत नाही, अशी डरकाळी शिवसेनेने फोडली़ मात्र थोड्याच वेळात शिवसेनेने शेपूट घालत मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधानांचे समन्वयक म्हणून स्वागत करण्याची तयारी दाखविली़
विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेच्या महासभेत निवेदन करीत भाजपा सरकारला लक्ष्य
केले़ मुख्यमंत्री मुंबईच्या विकासाचे निर्णय घेण्यास सक्षम नाहीत का,
असा टोला लगावित शिवसेना
एवढी लाचार का, असा जाबही विचारला़
यास प्रत्युत्तर देताना हे कंत्राट हुकले म्हणून कोणत्या कंपनीने सभागृहात गोंधळ घालण्याचे पैसे काँग्रेसला दिले, असा खळबजनक आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला़ भाजपाचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिवसेनेला चिथवण्याची खेळी काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी केली़ मुंबईला वेगळे करण्याचे पाप शिवसेना करणार
नाही, असे भावनिक आवाहन
करीत छेडा यांनी शिवसेनेची कोंडी केली़ (प्रतिनिधी)
च्पक्षाचा अजेंडा आणि सत्तेतील भागीदारी सांभाळण्यासाठी शिवसेनेचे आमदार व प्रतोद सुनील प्रभू यांना राजकीय आखाड्यात उतरावे लागले़ विशेष समिती नेमण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही़
च्मुंबईला अशा कोणत्याही समितीची गरज नाही़ मात्र मुख्यमंत्री आणि महापौर यांना एकत्रित आणून मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान समन्वयकाची भूमिकेत असतील तर त्यांचे स्वागतच करू, अशी सावध भूमिका प्रभू यांनी मांडली़ मुंबईच्या समस्येसाठी विशेष समिती नेमल्यास मुख्यमंत्रीच त्याचे प्रमुख असावे, अशी भूमिका मनसेने मांडली़