वसई-विरारमध्ये स्वाइन नियंत्रणात

By Admin | Updated: March 11, 2015 22:27 IST2015-03-11T22:27:43+5:302015-03-11T22:27:43+5:30

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे स्वाइन फ्लूची लागण झालेल्या

Controlling swine in Vasai-Virar | वसई-विरारमध्ये स्वाइन नियंत्रणात

वसई-विरारमध्ये स्वाइन नियंत्रणात

वसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेतल्यामुळे स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. महानगरपालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे ७, तर संशयित १२ रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे महानगरपालिका सूत्राने सांगितले. अन्य सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही मध्यंतरी स्वाइन फ्लूचे अनेक रुग्ण आढळले होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या आजारासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली तसेच रुग्णांवर जलदगतीने उपचार व्हावेत, यासाठी विविध ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे स्थापन केली तसेच महानगरपालिकेच्या डी.एम. पेटीट रुग्णालयात वेगळी रूम ठेवण्यात आली.
शासनानेही या प्रश्नी गंभीर दखल घेऊन महानगरपालिकेला योग्य तो औषध व साहित्याचा पुरवठा केल्याचे वैद्यकीय अधिकारी राणे यांनी लोकमतला सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, वसई-विरार उपप्रदेशात अनेक संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ७ रुग्ण निश्चित झाले. सध्या खाजगी रुग्णालयात किती स्वाइन फ्लूचे रुग्ण असतील, हे सांगणे कठीण आहे. परंतु, स्वाइन फ्लू वर नियंत्रण मिळवण्यात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे, असा दावा त्यांनी या वेळी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Controlling swine in Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.