आचारसंहितेच्या तक्रारींसाठी कंट्रोल रूम
By Admin | Updated: October 7, 2014 23:24 IST2014-10-07T23:24:42+5:302014-10-07T23:24:42+5:30
जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग करण्यासह परस्परांविरोधात बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावल्याच्या सुमारे ४८८ तक्रारी निवडणूक नियंत्रण विभागाकडे केल्या आहेत.

आचारसंहितेच्या तक्रारींसाठी कंट्रोल रूम
ठाणे : जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग करण्यासह परस्परांविरोधात बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज लावल्याच्या सुमारे ४८८ तक्रारी निवडणूक नियंत्रण विभागाकडे केल्या आहेत.
आदर्श आचारसंहितेसह मतदारांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेने निवडणूक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू
असतो.आतापर्यंतमिळालेल्या तक्रारींवर संबंधितांची चौकशी सुरू आहे. काहींवर तत्काळ कारवाई करून त्या दूर करण्यात आल्या आहेत. या जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षासह प्रत्येक म्हणजे १८ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयांमध्येदेखील तक्रार नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, प्रत्येक कार्यालयात हेल्पलाइन दूरध्वनी सेवादेखील आहे. (प्रतिनिधी)