Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेडयांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार, कॉफी टेबल बूकचे प्रकाशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 21:30 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी येथे केले. राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स आॅफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे (कॉफी टेबल बूक) राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे.’सहारिया म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. या पुस्तकात त्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे. कुरूंदकर यांनी कॉफी टेबल बूकच्या प्रकाशनासंदभार्तील भूमिका निश्चित केली. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. 

टॅग्स :सरकार