मुंबई - पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईत यंदा मुंबई महापालिकेने गाळउपश्याचे उद्दिष्ट १२ लाख मेट्रिक टनांवरून थेट आठ लाख मेट्रिक टनांवर आणत सुमारे ३३ टक्क्यांची कपात केली आहे. गाळाबरोबर तरंगणारा कचरा, प्लास्टिक आणि इतर वस्तूही असतात. त्यामुळे कंत्राटदारांना जास्त पैसे दिले जात असल्याचा संशय निर्माण झाल्याने फक्त गाळ काढण्यावर भर देऊन त्याचेच पैसे दिले जावेत, यासाठी उद्दिष्ट कमी केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
मुंबईत २६१.५२ किलोमीटर लांबीचे मोठे, तर ४११.५६ किलोमीटर लांबीचे लहान नाले आहेत. याशिवाय विविध प्रकारचे नाले मिळून एकूण ड्रेनेज नेटवर्क ३,८०० किलोमीटर आहे. पालिकेचे यंदा लहान नाल्यांतून ३.६७ लाख मेट्रिक टन, मोठ्या नाल्यांतून ३.४१ लाख मेट्रिक टन, तर मिठी नदीतून १.३२ लाख मेट्रिक टन, असा एकूण ८.४१ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन आहे.
पाणी साचण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष महापालिकेने यंदा पाणी तुंबणाऱ्या भागातील चोकिंग पॉइंट्सवर लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरवले आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘एल’ वॉर्डातील साकीनाका, कुर्ला आणि अंधेरी भागांतील ड्रेनेज चोकिंग पॉइंट्सवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. अनेक ठिकाणी नाले कल्व्हर्टखाली असल्याने यंत्रे आत जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे देखभाल कामात अडचणी येतात.
घोटाळ्यामुळे निर्णय मिठी नदी नालेसफाईतील १,१०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नालेसफाईचे गाळ काढण्याचे उद्दिष्ट एकदम ३३ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
१२ एप्रिलपर्यंतच्या नालेसफाईवर दृष्टिक्षेप (टक्क्यांत) एफ उत्तर ३१. ५६ एफ दक्षिण २७. १२ जी उत्तर २८.६२ जी दक्षिण २५.८५ एच पूर्व ३२.८४ एच पश्चिम १५. ७२ के पूर्व ८.५८ के पश्चिम २७.८८ पी उत्तर १२.५५ पी दक्षिण ३०. ९४ आर उत्तर २२.५४ आर मध्य १३. ७९ आर दक्षिण १०. २७ एल ४. ८६ एम पूर्व १०.३४ एम पश्चिम ३. ३४ एन ३२. ५५ एस १. ५८ टी २३. ०८