ठेकेदारांची कुंडली काढणार
By Admin | Updated: October 4, 2014 01:55 IST2014-10-04T01:55:32+5:302014-10-04T01:55:32+5:30
ई-निविदेतील भ्रष्टाचार उजेडात आल्यानंतर झोप उडालेल्या पालिकेने अशा गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी पावले उचलली आहेत़

ठेकेदारांची कुंडली काढणार
>मुंबई : ई-निविदेतील भ्रष्टाचार उजेडात आल्यानंतर झोप उडालेल्या पालिकेने अशा गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी पावले उचलली आहेत़ त्यानुसार निविदा भरणा:या ठेकेदाराच्या कामाचा पूर्वइतिहास व त्याच्या कामाचा दर्जा याची छाननी करणारे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन क्रमांक (डीआयएन) आणण्यात येणार आह़े त्यामुळे कारवाईनंतरही मागच्या दाराने पालिकेत प्रवेश करणा:या ठेकेदारांच्या कुंडल्याच प्रशासनाला मिळणार आहेत़
प्रभागस्तरावरील नागरी कामे वॉर्डातील अभियंत्यांना हाताशी धरून ठेकेदार मिळवत असल्याचे ई-निविदेच्या घोटाळ्यातून दिसून आल़े मर्जीतील ठेकेदारांना निविदा
भरता याव्या यासाठी रात्रीच्या वेळेत लिंक उघडण्यात येत होती़ इतर
वेळेस लिंक ब्लॉक केली जात असल्याने या निविदांमध्ये स्पर्धा झालीच नाही़ त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाल़े या प्रकरणात एकूण 23 अभियंत्यांची चौकशी सुरू
आह़े यापैकी 9 जणांना निलंबित करण्यात आल़े
असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सावधगिरी म्हणून पालिकेच्या प्रकल्पासाठी निविदा भरणा:या कंपनीच्या संचालकाला खास ओळख पटवून देणारा क्रमांक देण्यात येणार आह़े
जेणोकरून सिस्टीममध्ये हा क्रमांक टाकल्यास निविदा भरणा:या ठेकेदाराने यापूर्वी कोणती कामे केली असून, त्याच्या कामगिरीचा दर्जा
कसा होता, ही माहितीच तत्काळ उपलब्ध होणार आह़े
त्याच वेळी
अशा ठेकेदाराला बाहेरचा रस्ता दाखविणो शक्य होईल, असा विश्वास अधिका:यांकडून व्यक्त होत
आह़े (प्रतिनिधी)
च्एखाद्या आर्थिक गैरव्यवहारात ठेकेदाराला पकडल्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई अथवा काळ्या यादीत टाकण्याची
कार्यवाही होत़े
च्मात्र नवीन कंपनी स्थापन करून तेच ठेकेदार पुन्हा पालिकेच्या निविदा भरत असल्याचे उजेडात आल़े नवीन पद्धतीमध्ये त्या ठेकेदाराला कंत्रट देण्याआधी पालिकेला त्याची कुंडलीच कळणार आह़े
च्कंपनीच्या संचालकाला देण्यात येणारा
डीआयएन हा क्रमांक क्रेडिट कार्डच्या क्रमांकाप्रमाणो असेल़ यामध्ये संबंधित कंपनीने आतार्पयत कुठे काम केले?
च्संचालकाची व्यक्तिगत माहिती यामध्ये नोंदणी क्रमांक, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आदी माहिती असेल. त्यामुळे या कंपनीला पूर्वी काळ्या यादीत टाकले आहे का? संचालकाने दुसरी कंपनी स्थापन केली आहे का? याचा शोध लागेल़