कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धनादेश वटेना
By Admin | Updated: June 3, 2015 23:04 IST2015-06-03T23:04:21+5:302015-06-03T23:04:21+5:30
ठाणे महापालिकेत घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या रोखीकरणाच्या देयकाचा मुद्दा गाजत असतानाच आता अतिक्रमण विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या का

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धनादेश वटेना
ठाणे : ठाणे महापालिकेत घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांच्या रोखीकरणाच्या देयकाचा मुद्दा गाजत असतानाच आता अतिक्रमण विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या काही चालकांना दिलेले वेतनाचे धनादेश वटलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. हे कर्मचारी खाजगी ठेकेदाराकडे कामाला होते. आता त्यांनी यासंदर्भात पालिकेला साकडे घातले असून आमचे धनादेश मिळवून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कर्मचारीवर्ग तुटपुंजा असल्याने खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून कर्मचारीवर्ग कारवाईसाठी घेतला जात आहे. यामध्ये ठेकेदाराचीच वाहने असून त्या वाहनांवर खाजगी ठेकेदाराकरवी कर्मचारी नेमले जात आहेत. परंतु, तीन महिन्यांपासून काही चालकांना वेतनच दिलेले नाही. यातील वाहनचालक मंगेश होनमाने याला तीन महिन्यांपासून वेतन अदा केले गेले नव्हते. त्यामुळे त्याने ठेकेदार मे. भूमी कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडे वेतन मिळावे म्हणून मागणी केली होती. अखेर, त्याचे तीन महिन्यांचे ३२ हजार ६५४ रुपयांचे वेतन धनादेशाद्वारे त्याला अदा केले. त्यानंतर, तो धनादेश घेऊन बँकेत
गेला असता तो धनादेश वटलाच
नाही.