१९२५ ते २०१५ पर्यंत मध्य रेल्वेचा अविरत प्रवास
By Admin | Updated: February 3, 2015 23:14 IST2015-02-03T23:14:22+5:302015-02-03T23:14:22+5:30
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सुविधेला म्हणजेच चाकरमान्यांच्या लाईफलाईनला सोमवारी ९० वर्षे पूर्ण झाली.

१९२५ ते २०१५ पर्यंत मध्य रेल्वेचा अविरत प्रवास
अनिकेत घमंडी - डोंबिवली
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सुविधेला म्हणजेच चाकरमान्यांच्या लाईफलाईनला सोमवारी ९० वर्षे पूर्ण झाली. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी ही सुविधा मुंबई (सीएसटी) ते कुर्ला मार्गावर सुरु झाली. त्यावेळी ब्रिटीश राजवटीचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा कंदिल दाखवला होता. तेव्हा ४ डब्यांची लोकल धावत होती आजमितीस ती १५ डब्यांची झाली असून आगामी काळात आणखी काही डबे वाढवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. विशेष म्हणजे त्यावेळी हार्बर मार्गावरही सुविधा सुरु झाली होती.
प्रवासी संख्येत लाखोंची भर
वर्षफेऱ्याप्रवासी संख्या
१९२५ १५० २.२ लाख प्रवासी,
१९३५३३० ३ लाख प्रवासी
१९४५४८५ ..................
१९५१५१९४ लाख प्रवासी
१९६१५५३ ५ लाख प्रवासी
१९७१ ५८६ ६ लाख प्रवासी,
१९८१७०३ १३.२ लाख प्रवासी,
१९९१ १०१५ २३.५ लाख प्रवासी,
२००१ १०८६ २८.५ लाख प्रवासी,
२०१५१६१८४१ लाख प्रवासी.
१९२५- ४ डबे (हार्बर मार्गावर), १९२७ - ८ डबे, मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर, १९६१ - ९ डबे मुख्य मार्गावर, १९८६ - १२ डबे, मुख्य मार्ग, १९८७ - १२ डब्यांची लोकल कर्जत मार्गावर, २००८ - १२ डब्यांची लोकल कसा-यापर्यंत, २०१० - १२ डबा ट्रान्स हार्बर मार्गावर, २०१२- १५ डब्यांची गाडी मुख्य मार्गावर.
मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकात्त्यांकडून मिळालेल्या या आकड्यांच्या तपशीलानुसार २००१ ते २०१५ या कालावधीत लोकल फेऱ्या शेकडोने वाढलेल्या असल्या तरीही प्रवासी संख्या मात्र जवळपास दुपटीने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. या चौदा वर्षांच्या कालावधीत मध्य रेल्वेवर थतन्ही मार्गावर १२.५ लाख एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.