वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम जोरात सुरू

By Admin | Updated: December 22, 2014 22:38 IST2014-12-22T22:38:33+5:302014-12-22T22:38:33+5:30

महाड-पंढरपूर मार्गावरील रायगड जिल्ह्यातील वरंध घाटाच्या हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले असून यामुळे घाटात होणा-या अपघाताप्रसंगी होणारी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.

Continuation of the work of the patrol wall of the Varhad Ghat | वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम जोरात सुरू

वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम जोरात सुरू

बिरवाडी : महाड-पंढरपूर मार्गावरील रायगड जिल्ह्यातील वरंध घाटाच्या हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले असून यामुळे घाटात होणा-या अपघाताप्रसंगी होणारी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सार्वजनिक विभागाचे अभियंता पेठेराव यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता रस्ते दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करण्यात आला असून निधी मंजूर असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. सुमारे २० लाख रुपये एवढा निधी दुरुस्तीच्या कामाकरिता उपलब्ध झाला असून घाटातील होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु आहे.
प्रवासादरम्यान अवघड वळणावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७६ कि.मी. च्या परिसरातील अवघड व धोकादायक वळणावर संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले.

Web Title: Continuation of the work of the patrol wall of the Varhad Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.