ठाण्यात 13,244 घरांत दूषित पाणी

By Admin | Updated: November 15, 2014 02:23 IST2014-11-15T02:23:45+5:302014-11-15T02:23:45+5:30

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केला.

Contaminated water in 13,244 houses in Thane | ठाण्यात 13,244 घरांत दूषित पाणी

ठाण्यात 13,244 घरांत दूषित पाणी

ठाणो : मुंबईपाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केला. 6क्क् लीटरच्या टँकरमध्ये औषधाची मात्र ही फारच कमी टाकली जात असल्याने त्याने मच्छर मरत नसून उलट त्यांची संख्या वाढत असल्याचेही सदस्यांनी स्पष्ट केले. आजघडीला ठाण्यात 13,244 घरांत दूषित पाणी आढळले असून डेंग्यू रुग्णांची संख्या 68वरून 96 झाल्याचे या वेळी आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली होती. याच मुद्दय़ावर शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. आरोग्य विभागामार्फत टँकरमार्फत केल्या जात असलेल्या औषध फवारणीत 6क्क् लीटरच्या टँकरमध्ये केवळ 5क्क् मिली औषधाची मात्र टाकली जात असल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. तसेच या टँकरला 15क् फूट पाइप लावणो प्रस्तावात नमूद असताना 4क् फूट पाइप लावून फवारणी केली जात असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. टँकरमध्ये औषधाची मात्र कमी असल्याने त्याने मच्छरही दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हेच औषध मी प्राशन करतो आणि आरोग्य विभागाचा कारभार कसा भोंगळ पद्धतीने सुरू आहे, हे उघड करतो, असे आव्हानही त्यांनी प्रशासनाला दिले. 
 
च्आरोग्य विभागाने स्पष्टीकरण करताना जानेवारी ते आतार्पयत शहरातील 2 लाख 62 हजार 35क् घरांची तपासणी करण्यात आली असून त्यात 13 हजार 244 घरात दूषित पाणी आढळल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी सांगितले. 
च्1 नोव्हेंबर्पयत शहरात डेंग्यूचे 68 रुग्ण होते. परंतु, आता त्यात वाढ झाली असून शहरात आजघडीला 96 रुग्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयाचे आता महासभेत पोस्टमार्टम केले जाईल, असे सांगत सदस्यांनी हा विषय आवरता घेतला. येत्या महासभेत याच मुद्दय़ावरून विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी लक्षवेधी मांडली आहे.

 

Web Title: Contaminated water in 13,244 houses in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.