बांधकाम कामगार आक्रमक

By Admin | Updated: July 27, 2015 02:16 IST2015-07-27T02:16:31+5:302015-07-27T02:16:31+5:30

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बिल्डरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या सेस (उपकर) रकमेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याने

Construction workers aggressive | बांधकाम कामगार आक्रमक

बांधकाम कामगार आक्रमक

मुंबई : बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बिल्डरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या सेस (उपकर) रकमेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत बांधकाम कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बांधकाम कामगारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीने केलेल्या मागणीनुसार, बिल्डरांकडून वसूल करण्यात येणारी सेसची रक्कम मंडळातील अधिकाऱ्यांनी डीडीऐवजी धनादेशने स्वीकारल्याचे कॅगचे म्हणणे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही बिल्डरांचे धनादेश वटलेच नाहीत. मात्र अशा बिल्डरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे बिल्डरांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समन्वय समितीने केली आहे. दरम्यान, नाका आणि बांधकाम कामगारांच्या नाव नोंदणीचा जोर वाढवण्याची प्रमुख मागणी समितीने केली आहे. मुळात नाव नोंदणीपासून वंचित राहिल्याने कामगारांना सरकारी योजनांना मुकावे लागते. कामगार संघटनांनी पुढाकार घेतल्याने जेमतेम नोंदणी होत असून कल्याण मंडळाकडून कामगारांच्या नोंदणी करण्यात उलट अडथळेच निर्माण होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अधिकाधिक कामगारांची नोंदणी करण्याची मागणी समितीने केली आहे.

Web Title: Construction workers aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.