मतदान यंत्रे बंदोबस्तात
By Admin | Updated: October 16, 2014 23:24 IST2014-10-16T23:24:54+5:302014-10-16T23:24:54+5:30
18 विधानसभा मतदारसंघांतील 238 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणा:या 944क् मतदान यंत्रंना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहे.

मतदान यंत्रे बंदोबस्तात
सुरेश लोखंडे ल्ल ठाणो
18 विधानसभा मतदारसंघांतील 238 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणा:या 944क् मतदान यंत्रंना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहे. मतमोजणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोर्पयत या मतदान यंत्रच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस तसेच राज्य व केंद्रीय सुरक्षादलाच्या जवानांचा तिहेरी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील 59 लाख 9क् हजार 767 मतदारांपैकी 5क्.61 टक्के म्हणजे 3क् लाख 9 हजार 835 मतदारांनी मतदान केले. सहा हजार 145 मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदानास मतमोजणीर्पयत कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्तात ठेवले आहे. तिथे कोणालाही प्रवेश नाही तसेच संपूर्ण परिसर सीसी टीव्हीच्या नजरेखाली आहे. यंत्रे ठेवलेल्या परिसरात देखील कोणालाही प्रवेश नाही. प्रत्येक यंत्रे बुथ ऑफिसर आणि तेथे असलेले पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सीलबंद करण्यात आले असून मतमोजणीच्या वेळी ते सील व्यवस्थित असल्याची खात्री करूनच ते तोडून त्यातील मतांची मोजणी केली जाणार आहे. यामुळे या यंत्रच्या सुरक्षेची परिपूर्ण काळजी घेतली गेली आहे. ही सुरक्षा कडेकोट करण्यासाठी प्रत्यक्ष यंत्र ठेवलेल्या स्थानाची सुरक्षा केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडे ते स्थान असलेल्या इमारतीची सुरक्षा राज्यराखीव जवानांकडे तर परिसराची सुरक्षा पोलिसांकडे असा तिहेरी सुरक्षा व्यूह रचण्यात आला आहे.
4शस्त्रधारी जवानांच्या तीन प्रकारच्या रिंगणात मतदान यंत्रंची सुरक्षा रात्रंदिवस राखली जात आहे. मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळ केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात आहेत. ती जागा असलेल्या इमारतीत सुरक्षा राज्य राखीव दलाचे जवान सांभाळत आहेत. तर तिस:या म्हणजे त्या इमारतीच्या बाहेरील परिसराची सुरक्षा पोलीस यंत्रणा राखते आहे.
4मतदान यंत्रंची सुरक्षा व्यवस्था लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणोच करण्यात आली आहे. मतदान यंत्रे ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, त्याच ठिकाणी मतमोजणीचे नियोजन करण्यात आल्याचे उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी लोकमतला सांगितले.