गुन्हा नोंद असलेला कॉन्स्टेबल मोकाटच

By Admin | Updated: March 30, 2017 04:27 IST2017-03-30T04:27:31+5:302017-03-30T04:27:31+5:30

खाकी वर्दीचा गैरवापर करीत तरुणीवर बलात्कार व भू्रणहत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाच दिवस

Constable Mokatch with a crime registered | गुन्हा नोंद असलेला कॉन्स्टेबल मोकाटच

गुन्हा नोंद असलेला कॉन्स्टेबल मोकाटच

मुंबई : खाकी वर्दीचा गैरवापर करीत तरुणीवर बलात्कार व भू्रणहत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटूनही कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याची अद्याप सायन पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. याउलट पीडित तरुणीभोवती चौकशीचा ससेमिरा सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेकडून चौकशी झाल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पीडितेला वैद्यकीय तपासणी व वारंवार जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांकडून पाचारण केले जात आहे.
पतीपासून विभक्त राहात असलेल्या एका २९ वर्षांच्या तरुणीला आमिष दाखवत कॉन्स्टेबल तिऊरवडेने शारीरिक संबंध ठेवले. नंतर त्याने मारहाण करून गर्भपात केला. याबाबत पीडित तरुणीच्या तक्रारीवर वरिष्ठांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ फेबु्रवारीला दिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आली. त्या वेळी तरुणीची वैद्यकीय तपासणी व सविस्तर जबाब आणि संबंधित सर्व पुरावे जमविले. तीन आठवड्यांनंतर त्यांच्या अहवालानुसार २४ मार्चला भोईवाडा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल तिऊरवडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयुक्तांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा तपास सायन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Constable Mokatch with a crime registered