क्रॉफर्ड मार्केटमधील गाळेधारकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:42 IST2018-10-18T00:41:38+5:302018-10-18T00:42:28+5:30
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ऐतिहासिक महात्मा जोतिबा फुले मंडईच्या म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटच्या नूतनीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच ...

क्रॉफर्ड मार्केटमधील गाळेधारकांना दिलासा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ऐतिहासिक महात्मा जोतिबा फुले मंडईच्या म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटच्या नूतनीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होत आहे. मात्र, यामध्ये बाधित ठरलेल्या दीडशे गाळेधारकांकडून स्थलांतराला विरोध होत होता. अखेर पालिका प्रशासनाने मंडईजवळील जागेमध्ये तीन वर्षांसाठी पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास महापालिकेच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे. अनेक अडथळे पार करून या मंडईच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, दुसºया टप्प्यात भूमिगत वाहनतळ व अन्य कामांसाठी जागा रिकामी करण्यास गाळेधारकांनी विरोध केला. या गाळेधारांना जागा रिकामी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत पालिकेने दिली.
याबाबत बाजार, उद्यान समितीचे अध्यक्ष हाजी मोहमद हलीम खान यांनी बुधवारी पालिका अधिकारी व गाळेधारकांची बैठक बोलावली होती. चर्चेअंती गाळेधारकांनी मंडईशेजारील जागा स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. गाळेधारकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मंडईच्या पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वास खान यांनी या वेळी व्यक्त केला आहे.