ठाणो वायफायने कनेक्ट होणार
By Admin | Updated: July 26, 2014 01:54 IST2014-07-26T01:54:05+5:302014-07-26T01:54:05+5:30
ठाणो महापालिका हद्दीत वायफाय सेवा सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी गुरुवारी रात्री उशिरार्पयत चाललेल्या अर्थसंकल्पाच्या महासभेत केली.

ठाणो वायफायने कनेक्ट होणार
ठाणो : कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ मुंबईसह आता ठाणो महापालिका हद्दीत वायफाय सेवा सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी गुरुवारी रात्री उशिरार्पयत चाललेल्या अर्थसंकल्पाच्या महासभेत केली. वायफाय सिटी या योजनेंतर्गत एमएसआरडीसीच्या ब्रिजवर छोटे अॅण्टेना बसवले आहेत. त्याप्रमाणो, बीओटी तत्त्वावर इलेक्ट्रीक पोलवर असे अॅण्टेना बसवण्यास परवानगी दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातील नाल्यांची सफाईसुद्धा आता दोन रोबोट मल्टिपर्पज एलिव्हेटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 11 कोटींची
तरतूद करण्यात येणार आहे.
या रोबोटद्वारे शहरातील नाले मशिनरीच्या साहाय्याने साफ केले जाणार आहेत़
वायफायच्या चर्चेच्या वेळी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी रोबोट मल्टिपर्पज एलिव्हेटरचा प्रस्ताव पुढे आणला. तसेच घोडबंदर परिसरातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत 1क्क् खाटांच्या रुग्णालयासाठी 15 कोटी, तर शालेय विद्याथ्र्याच्या बेंचेस खरेदीसाठी 1क् कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. कळवा रुग्णालयापाठोपाठ वागळे, कोपरी, घोडबंदर आदी ठिकाणी
पाच डायलेसिस सेंटर सुरू करण्यासाठी 1क् कोटी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी स्थानिक पातळीवर प्राधिकरण करणो प्रस्तावित असून, या कामासाठी अंदाजपत्रकात 1क् कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
जीआयएस सव्र्हेनुसार वाढीव मालमत्तांना कर आकारणी केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात 3क्क् कोटींची भर पडेल, असा दावा त्यांनी केला. सध्या शहरात पार्किग समस्या गंभीर असून, आता सव्र्हिस रोडवरसुद्धा पार्किग झोन तयार करावे, तर एम.एच. हायस्कूल ते ठाणो जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकात 5क् लाखांची तरतूद तरतूद प्रस्तावित केली आहे. परिवहन सेवेकडील कर्मचा:यांच्या थकबाकीपोटी
15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात आता आणखी 5 कोटींची वाढ सुचवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
च्महापालिका हद्दीत मराठी शाळा आहेत. यापैकी सरस्वती, ब्राrाण विद्यालय, शिवसमर्थ विद्यालय, नाखवा हायस्कूल आदी अनेक मराठी माध्यमाच्या शाळा असून, त्यांना पिण्याच्या पाण्याचे देयक बिगर घरगुती दराने दिले जात आहे. परंतु, विद्याथ्र्याची घटलेली संख्या लक्षात घेता त्यांच्याकडून घरगुती दरानेच बिल आकारणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
च्श्रीनगर ते ओवळा रस्त्याच्या कामासाठी 5 कोटी, येऊर विकासासाठी 5 कोटी, कोपरी खत प्रकल्पाच्या नियोजनासाठी 25 कोटी, पोखरण रोड नं. 1 रुंदीकरण तसेच ब्रिज व लोकमान्यनगरमधील डी.पी. रोडकरिता 15 कोटी आदी तरतूद केल्या आहेत.