काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशची कमिटीच जबाबदार

By Admin | Updated: November 27, 2014 22:41 IST2014-11-27T22:41:28+5:302014-11-27T22:41:28+5:30

विधानसभा निवडणुकीत ठाणो आणि पालघर जिल्ह्यांत काँग्रेसचा जो पराभव झाला, त्याला प्रदेश काँग्रेस कमिटीच जबाबदार असल्याचा आरोप ठाणो ग्रामीणचे माजी अध्यक्ष दामू शिंगडा यांनी केला आहे.

The Congress's defeat is a responsible committee | काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशची कमिटीच जबाबदार

काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशची कमिटीच जबाबदार

जितेंद्र कालेकर ल्ल ठाणो
विधानसभा निवडणुकीत ठाणो आणि पालघर जिल्ह्यांत काँग्रेसचा जो पराभव झाला, त्याला प्रदेश काँग्रेस कमिटीच जबाबदार असल्याचा आरोप ठाणो ग्रामीणचे माजी अध्यक्ष दामू शिंगडा यांनी केला आहे. किमान, आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नाती-गोती बाजूला ठेऊन संघटनेला वेळ देणा:या आणि जनसंपर्क दांडगा असणा:यांना कार्यक्षमांना संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षाही ‘लोकमत’शी बातचीत करताना त्यांनी व्यक्त केली.
शिंगडा पुढे म्हणाले, एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचे काम केले आहे. त्यातूनच पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलो. जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.  परंतु, आता प्रदेश काँग्रेसनेही आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केले पाहिजेत. साठमारीचे प्रकार बंद झाले पाहिजेत. प्रदेश कार्यकारिणी निर्जीव असल्यामुळेच काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. 
गेल्या निवडणुकीत गावितांच्या रूपाने काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आला होता. परंतु, त्यांनी पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष केले. त्यांनी केवळ गावित काँग्रेस निर्माण करण्याचे प्रय} केले. काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना विचारात घेतलेच नाही. 
जर आता ही परिस्थिती बदलायची असेल तर पक्ष संघटनेला विचारात घेतले पाहिजे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि गावितांनी पक्षात घेतलेले उदय बंधू शिवसेनेतून आले. ते पुन्हा 2क्12 मध्ये शिवसेनेतच गेले. गेल्या वर्षीदेखील माणिकराव आणि गावितांमुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले शंकर नम हे पुन्हा शिवसेनेत गेले. त्यांनी शिवसेनेतून उमेदवारीही मिळवली. मुळात, निष्ठावान कार्यकत्र्याचा विचार प्रदेशने केला पाहिजे. पक्षात कोणाला घ्यायचे, याचाही विचार झाला पाहिजे. 
आता पुन्हा काँग्रेसला ऊर्जितावस्था येण्यासाठी संघटनेला वेळ देणा:या तसेच जनसंपर्क दांडगा असणा:यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली गेली पाहिजे. तरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील. जास्तीतजास्त उमेदवार निवडून येतील, असा आशावादही 
शिंगडा यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोडलेल्या या टीकास्त्रमुळे काँग्रेसजनात तर्क-वितर्काना उधाण आले आहे. 

 

Web Title: The Congress's defeat is a responsible committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.