आक्रमक प्रचाराची काँग्रेसची रणनीती

By Admin | Updated: September 17, 2014 02:18 IST2014-09-17T02:18:12+5:302014-09-17T02:18:12+5:30

सरकारची कामगिरी, धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व यावर भर देऊन तुलनेने मवाळ प्रचार करणा:या काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे.

Congress strategy for aggressive propaganda | आक्रमक प्रचाराची काँग्रेसची रणनीती

आक्रमक प्रचाराची काँग्रेसची रणनीती

यदु जोशी - मुंबई
एरवी आपली ध्येयधोरणो, आपल्या सरकारची कामगिरी, धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व यावर भर देऊन तुलनेने मवाळ प्रचार करणा:या काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. त्यानुसार केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचे पितळ उघडे पाडताना आघाडी सरकारने केलेली विकास कामे जोरकसपणो मतदारांसमोर मांडण्यात येणार आहेत. 
भाजपाने लोकसभा निवडणुकीत आक्रमक प्रचार करीत केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षाची कोंडी केली होती. प्रचार सभांपासून सोशल मीडियार्पयत भाजपाने पद्धतशीरपणो यंत्रणा राबवित काँग्रेसला टार्गेट केले होते आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. आता तीच संधी भाजपा-शिवसेनेकडून विधानसभेच्या प्रचारात साधली जाईल, असे चित्र असताना त्याला ‘जशाच तसे’ उत्तर देण्याचे काँग्रेसच्या प्रचार समितीने ठरविले आहे. उद्योग मंत्री नारायण राणो यांच्यासारखे आक्रमक नेते या समितीचे अध्यक्ष असल्यानेही काँग्रेसकडून तुंबळ प्रचार अवलंबिला जाईल, हे स्पष्ट आहे. 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योग मंत्री नारायण राणो, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदी राज्यपातळीवरील दहा स्टार प्रचारकांना भाजपा-शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय डझनभर केंद्रीय नेते महाराष्ट्रातील प्रचारात उतरणार आहेत.जवळपास 25क् सभा होतील. 
प्रचार समितीचे समन्वयक मुजफ्फर हुसेन यांनी सांगितले की, राज्य वा केंद्रीय पातळीवरील नेत्यांची प्रत्येक मतदारसंघात किमान एक सभा होईल. मतदारांची दिशाभूल करण्याचा भाजपाचा डाव लोकसभेत यशस्वी झाला तो यावेळी उधळून लावण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. 
 
प्रसार माध्यमांतून ज्या जाहिराती काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहेत त्याची पंच लाइन ही ‘महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच’ ही असेल. 5क् वर्षाच्या सत्ताकाळात काँग्रेसने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळेच महाराष्ट्र नंबर वन असल्याचे या जाहिरातींमधून प्रभावीपणो मांडण्यात येणार आहे.  
 
‘आम्ही जिंकणारच’, असा विश्वास जाहिरातींमधून व्यक्त केला जाणार आहे. काँग्रेसच्या मीडिया समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज लोकमतला ही माहिती दिली. 
 
1आघाडी सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना जशाच तसे उत्तर देणार. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरील आरोपही फेटाळणार. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे जोरदार समर्थन करण्याची भूमिका मांडणार. 
2आपली कामगिरी सांगण्यासाठी सकारात्मक प्रचार करतानाच 1995 ते 99 मधील युती सरकारच्या कारभाराबाबत नकारात्मक प्रचारही करणार. खंडणीखोर, राज्याला कर्जात टाकणा:यांचे सरकार हवे का? असा सवाल करणार.
31क्क् दिवसांत महागाई कमी करणार, पाकला धडा शिकविणार, विदेशातील काळा पैसा परत आणणार या मोदींच्या फोल आश्वासनावर प्रहार करणार.
 

 

Web Title: Congress strategy for aggressive propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.