लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील १७ प्रभाग समित्यांपैकी पहिल्या ६ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. यामध्ये ४ ठिकाणी भाजप शिंदेसेना महायुतीची सरशी झाली असून २ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले. सहापैकी तीन प्रभाग समितींमध्ये एकच अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या. तर ३ समित्यांच्या निवडणुकीत परळ, शिवडी, माटुंगा प्रभाग समितीची निवडणूक चुरशीची ठरली. यात माजी महापौर आणि उद्धवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांचा अवघ्या एका मताने महायुतीच्या उमेदवार मानसी सातमकर यांनी पराभव केला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने त्यांना ७ मते मिळाली.
गुरुवारी पार पडलेल्या ६ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’; ‘सी’ आणि ‘डी’; ‘एफ दक्षिण’ आणि ‘एफ उत्तर’ या तीन समित्यांच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. तर ‘आर मध्य‘ आणि ‘आर उत्तर’; ‘आर दक्षिण’; ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ या तीन प्रभाग समितीच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
आर उत्तर व आर मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रकाश दरेकर, आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी लीना देहरकर व सी आणि डी या प्रभाग समिती अध्यक्षपदी आकाश पुरोहित यांची बिनविरोध निवड झाली. तर ए,बी,ई प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्ञानराज निकम विजयी झाले. पी पूर्व व पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे हैदरअली अस्लम शेख विजयी झाले.
असे आहे अध्यक्ष सी, डी : आकाश पुरोहित - भाजप (बिनविरोध)आर उत्तर, आर मध्य : प्रकाश दरेकर- भाजप (बिनविरोध)आर दक्षिण विभाग : लिना देहेरकर- भाजप- (बिनविरोध)ए,बी, ई : ज्ञानराज निकम - काँग्रेस (विजयी ७ मते ) भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा पराभव - ५ मते एफ दक्षिण व एफ उत्तर : मानसी सातमकर - शिंदेसेना (८ मते ) श्रद्धा जाधव पराभूत उद्धवसेना (७ मते) पी पूर्व व पी पश्चिम : हैदर अली शेख - काँग्रेस ( विजयी - १० मते)अजित रावराणे यांचा पराभव - ८ मते
Web Summary : In Mumbai, BJP-Shinde Sena alliance won four ward committee elections. Congress secured two committee chairperson posts. Ex-Mayor Shraddha Jadhav lost by one vote.
Web Summary : मुंबई में, भाजपा-शिंदे सेना गठबंधन ने चार वार्ड समिति चुनाव जीते। कांग्रेस ने दो समिति अध्यक्ष पद हासिल किए। पूर्व महापौर श्रद्धा जाधव एक वोट से हार गईं।