Join us

कॉंग्रेस हा महिलांना सन्मान व समान संधी देणारा पक्ष आमदार अस्लम शेख 

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 24, 2023 18:16 IST

अस्लम शेख पुढे म्हणाले की, महिलांना समान संधी देण्याच्या चर्चा विविध व्यासपिठांवरुन नेहमीच होत असतात, मात्र कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो महिलांना समान संधी उपलब्ध करुन देतो.

मुंबई - मुंबई कॉंग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष वर्षा गायकवाड या कुशल प्रशासक तसेच अभ्यासू व आक्रमक नेत्या आहेत. यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेस यशाचे नव-नवे विक्रम स्थापित करेल, असे प्रतिपादन माजी मंत्री व मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख यांनी कांदिवलीत केले. कांदिवली पश्चिम येथील ठठाई भाटिया सभागृहात मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. 

अस्लम शेख पुढे म्हणाले की, महिलांना समान संधी देण्याच्या चर्चा विविध व्यासपिठांवरुन नेहमीच होत असतात, मात्र कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो महिलांना समान संधी उपलब्ध करुन देतो. याचं जिवंत उदाहरण वर्षा गायकवाड यांच्या रुपाने आपल्या समोर आहे. त्यांच्यात दडलेला कुशल प्रशासक आपण त्या मंत्री असताना पाहिला. विविध आंदोलनांध्ये दिसून येणाऱ्या त्यांच्यामधील आक्रमक बाण्यातून त्यांच्यातिल उत्तम  नेतृत्वाची झळक मिळते.   मुंबई कॉंग्रेसने सोपवलेली संघटनात्मक जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

यावेळी उत्तर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कालु बुधेलिया, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रवक्ता सचिन सावंत, मुंबई कॉंग्रेसचे सचिव संदेश कोंडविलकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :काँग्रेसमुंबईमहिला