Join us  

क्रांती मैदानातून काँग्रेसने दिला ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:45 AM

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली

मुंबई : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित सभेत काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात ''मोदी सरकार चले जाव''चा नारा दिला. प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा संकल्प व्यक्त करतानाच नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात हल्ला चढवला. नाना पटोले यांनी शुक्रवारी  टिळक भवन कार्यालयात बाळासाहेब थोरात यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर विधानभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला. क्रांती मैदानजवळ गोकुळदास तेजपाल सभागृहात झालेल्या बैठकीत हूकुमशाही पद्धतीने वागणारे व काळे कायदे आणून शेतक-यांना उद्‌ध्वस्त करणारे ''मोदी सरकार चले जाव'' असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपतकुमार, राज्य महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे, राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.कृषी कायदे महाराष्ट्रात नकोत !ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सर्वच नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा संकल्प केला. तसेच राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारचे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू करणार नाही, असा प्रस्ताव मंजूर करण्याचे आवाहन सर्व काँग्रेस मंत्र्यांना केले. केंद्राचे कायदे फेटाळून लावण्यासाठी जी पावले उचलायची आहेत ती लवकर उचला. येत्या अधिवेशनात तसा कायदा मंजूर करा, असे आवाहन एच.के.पाटील यांनी केले. काँग्रेस आहे, म्हणून सरकार आहे - अशोक चव्हाणकाँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. राज्यातील सरकार काँग्रेसच्या ध्येय धोरणांनुसारच चालेल, असे सांगत अशोक चव्हाण यांनी एकप्रकारे सहकारी पक्षांना इशारा दिला. तर निवडणुकीपूर्वी ऎनवेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. अडचणीच्या काळात ४४ आमदार निवडून आणले. त्यानंतर भाजपला सत्तेपासून रोखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केल्याचे सांगतानाच थोरात यांनी पटोले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :नाना पटोलेबाळासाहेब थोरात