काँग्रेस नगरसेवकाचे पद रद्द
By Admin | Updated: December 23, 2014 01:30 IST2014-12-23T01:30:40+5:302014-12-23T01:30:40+5:30
मालवणी वॉर्ड क्ऱ ३० मधील काँग्रेसचे नगरसेवक सिराज शेखयांना तिसरे अपत्य असल्याने आपल्या पदावरून जावे लागले आहे़

काँग्रेस नगरसेवकाचे पद रद्द
मुंबई : मालवणी वॉर्ड क्ऱ ३० मधील काँग्रेसचे नगरसेवक सिराज शेखयांना तिसरे अपत्य असल्याने आपल्या पदावरून जावे लागले आहे़ सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीत हे पद रद्द ठरविण्यात आले़ सिराज यांनी २०१२ मध्ये निवडणूक लढविताना दोन अपत्ये असल्याचे नमूद केले होते़ मात्र त्यांना तीन अपत्ये असल्याने त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले होते़ मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर शेख यांचे पद रद्दबातल करण्यात आले़