राज ठाकरे यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले अभिनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:07 IST2021-03-09T04:07:32+5:302021-03-09T04:07:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाणार प्रकल्पाबाबत काळानुसार लोकहितासाठी आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे म्हणत कोकणातील नाणार प्रकल्पाला ...

Congratulations to Raj Thackeray MP Gopal Shetty | राज ठाकरे यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले अभिनंदन

राज ठाकरे यांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाणार प्रकल्पाबाबत काळानुसार लोकहितासाठी आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे म्हणत कोकणातील नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

कोविडग्रस्त खासदार गोपाळ शेट्टी हे बोरीवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रत्नागिरी, राजापूरची रिफायनरी चालू करून नाणार प्रकल्प पुनः सुरू करण्यासाठी मनसे अध्यक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबद्दलही त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोना काळात देशभरात बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. तर अमर्यादित स्वयंरोजगारांना संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Congratulations to Raj Thackeray MP Gopal Shetty