मुंबई : शरीरात लपवून पाच कोटी रुपयांचे कोकेन लपवून आणणाऱ्या एका परदेशी महिलेला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ही महिला रिपब्लिक ऑफ काँगो या देशाची नागरिक असून बॉप्लून्ज नोदोमा (२६) असे तिचे नाव आहे.
आदिस अबाबा येथून मुंबईत येणाऱ्या विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या विमानाबाहेर सापळा रचला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
संबंधित आरोपीला शासकीय रुग्णालयातील जनरल सर्जरी विभागात दाखल केले जाते.
रुग्णालयातील डॉक्टर त्याचा एक्स रे काढतात.
त्यानंतर डॉक्टर आरोपीची सर्जरी करण्याऐवजी त्याला एक ते दोन दिवस हाय फायर डायट देतात. तसेच केळी खाण्यास देतात.
नैसर्गिक विधीमार्फत आरोपीने पोटात लपविलेल्या कॅप्सूल प्राप्त केले जातात.
सर्व कॅप्सूल उपस्थित अधिकाऱ्याच्या समोर मोजून सुपुर्द केले जातात.
त्यानंतर पुन्हा एक्स रे काढला जातो. त्यासाठीची असणारी कायदेशीर प्रक्रिया पार पडली जाते.
एखादी कॅप्सूल अडकली तर मात्र सर्जरीचा विचार केला जातो.
शरीरात ३४ कॅप्सूल
विमानातून उतरलेल्या आदिस अबाबा या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने शरीरात ३४ कॅप्सूलमध्ये ५४४ ग्रॅम कोकेन लपविल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे.