Join us

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 4, 2023 20:21 IST

हजारो नागरिकांचे झाले हाल

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिंडोशी येथील खडकपाडा  जवळ आज पहाटे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली.परिणामी आज संपूर्ण दिवसभर न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट होता. पालिकेने येथील पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे घरात एक थेंब पाणी नसल्याने परिणामी येथील इमारत क्रमांक १ ते ९ ( झोन ३) हिल व्ह्यू रो हाऊसेस तसेच इमारत क्रमांक १७,१८,१९,२०,२१,२४,२५ ( झोन २) येथील हजारो नागरिकांचे खूप हाल झाले.पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

येथील अनेक गृहनिर्माण सोसायटीत पाण्याचे ट्रॅकर मागवले. तसेच घरात पाणी नसल्याने आज अनेकांनी हॉटेल मधून जेवण व खाद्यपदार्थ तसेच ब्लिस्लरीचे मोठे कॅन मागवण्यात आले.परिणामी हॉटेल,ट्रॅकर व ब्लिस्लरी पाण्याचा व्यवसाय जोऱ्यात असल्याचे चित्र होते.

तर इमारत क्रमांक २० व २१ न्यु दिंडोशी एकदंत कॉ हौसिंग सोसायटीत सहा ट्रॅकर मागवून रात्री पाणीपुरवठा करण्यात आला अशी माहिती या सोसायटीचे अध्यक्ष मारुती उगले व सचिव अर्चना देसाई यांनी दिली.

टॅग्स :मुंबईपाणी