खोपोली पार्वती रु ग्णालयात मृताच्या नातेवाइकांचा गोंधळ
By Admin | Updated: March 26, 2015 22:37 IST2015-03-26T22:37:20+5:302015-03-26T22:37:20+5:30
खोपोली शहरातील डॉक्टर रणजीत मोहिते यांच्या पार्वती रु ग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला.

खोपोली पार्वती रु ग्णालयात मृताच्या नातेवाइकांचा गोंधळ
खालापूर : खोपोली शहरातील डॉक्टर रणजीत मोहिते यांच्या पार्वती रु ग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णाच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला. परळी येथील धुधाने वाडीतील एक रुग्ण उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यासाठी आणला असताना डॉक्टरांनी रु ग्णाची तपासणी करून त्याला मृत घोषित केल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाइकांनी संपूर्ण रुग्णालय डोक्यावर घेत डॉक्टरांनाच धक्काबुक्की केली. या घटनेने शहरातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पाली तालुक्याच्या परळी येथील धुधाने वाडीतील कृष्णा रामभाऊ धुधाने यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने स्थानिक पातळीवर उपचार करून पुढील उपचारासाठी खोपोलीतील पार्वती रुग्णालयात आणले होते. रुग्णाची डॉक्टर रणजीत मोहिते यांनी तपासणी करून रुग्ण मृत झाल्याचे नातेवाइकांना सांगितल्यावर मृताच्या नातेवाइकांनी गोंधळ घालून तणाव वाढवला. या प्रकरणी डॉक्टरांना बोलावून माहिती घेतल्यावर डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. या प्रकरणी मध्यस्थी करून पोलीस उपविभागीय अधिकारी बी. पी. कल्लुरकर यांनी संतप्त नातेवाइकांना शांत केले.
गेल्या काही वर्षांत पेण, कर्जतमध्ये रु ग्णांच्या नातेवाइकांकडून अप्रिय घटना घडल्यानंतर मेडिकल संघटनेने त्या विरोधात आवाज उठवला होता. याही घटनेने खोपोली शहरातील डॉक्टर भीतीच्या छायेखाली असून डॉक्टरसह रुग्णालयांची सुरक्षा धोक्यात आली असून संबंधितांवर कारवाईची गरज अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून रु ग्ण दाखल झाल्यानंतर काही मिनिटांत रुग्णाची ईसीजी केली. आम्ही उपचाराचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाही. त्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मात्र नातेवाईक आणि मित्रपरिवाराने नाहक तणाव निर्माण करून धक्काबुक्की केल्याने मी अस्वस्थ झालो आहे. या घटनेची माहिती मेडिकल संघटनेला दिली असून पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे.
- डॉ. रणजीत मोहिते, खोपोली.