पास आणि वेळेचा संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:39+5:302021-02-05T04:23:39+5:30
रेल्वे बातमी जाेड ज्या प्रवाशांचा रेल्वे पास शिल्लक आहे त्यांना पास वाढवून मिळेल का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला ...

पास आणि वेळेचा संभ्रम
रेल्वे बातमी जाेड
ज्या प्रवाशांचा रेल्वे पास शिल्लक आहे त्यांना पास वाढवून मिळेल का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तर, यावर आताच भाष्य करता येणार नाही असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
* निर्णय स्वागतार्ह
सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण दुपारी १२ ते ४ ची वेळ योग्य नाही. १२ वाजता रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर कामकाज आटोपून दुपारी ४ वाजेपर्यंत लोकल पकडणे कठीण आहे. कर्मचाऱ्यांनाही या वेळेत बस आणि खासगी वाहनाने प्रवास करावा लागेल. मात्र, किरकोळ दुकाने आणि मॉल्समधील दुकाने बंद करण्याची वेळ वाढल्याने उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना खरेदी करता येईल.
- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन
* उद्योग, व्यवसायांना उभारणी मिळणे शक्य
टप्प्याटप्प्याने सर्वांना लोकल पुन्हा सुरू करण्याच्या, रेस्टॉरंटना पहाटे १ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकल सेवेशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाताना अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, तर रेस्टॉरंट मालकांना वेळेच्या निर्बंधांमुळे तोटा सहन करावा लागत आहे. या उपायांमुळे उद्योग, व्यवसायांना उभारणी मिळणे शक्य होईल.
- शिवानंद शेट्टी, आहार
---------------------