डीसी-एसी परावर्तनाचा गोंधळात गोंधळ

By Admin | Updated: July 25, 2014 02:19 IST2014-07-25T02:19:08+5:302014-07-25T02:19:08+5:30

मध्य रेल्वेमार्गावर कुर्ला ते सीएसटीर्पयत डीसी (डायरेक्ट करंट) ते एसीच्या (अल्टरनेट करंट) कामाचा पूर्णपणो गोंधळ सुरू

The confusion of DC-AC reflection | डीसी-एसी परावर्तनाचा गोंधळात गोंधळ

डीसी-एसी परावर्तनाचा गोंधळात गोंधळ

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर कुर्ला ते सीएसटीर्पयत डीसी (डायरेक्ट करंट) ते एसीच्या (अल्टरनेट करंट) कामाचा पूर्णपणो गोंधळ सुरू असून, आता पावसाळ्यातील कामांचा फटका परावर्तनाला बसत आहे. त्यामुळे या कामाला लेटमार्क लागणार लागणार आहे.  
मध्य रेल्वेमार्गावर 121 लोकलच्या  1,618 फे:या होतात. यातून दिवसाला तब्बल 42 लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या दिमतीला नवीन लोकल आणण्याचा विचार सुरू असून, येत्या काही वर्षात बम्बार्डिअर लोकलही मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेमार्गावर डीसी ते एसीचे काम पूर्ण झाल्याशिवाय नवीन लोकल धावणो अशक्य आहे. हे काम ऑगस्ट महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा दावा रेल्वेकडून केला जात आहे. सध्या कल्याण ते ठाणो सर्व मार्गावर आणि ठाणो ते एलटीटी फक्त पाचव्या आणि सहाव्या मार्गावर डीसी-एसी परावर्तनाचे काम झाले आहे. त्यानंतर, कुर्ला ते सीएसटी सर्व मार्गावर काम होणो बाकी होते. मात्र, कल्याण ते एलटीटी एसी परावर्तनाचे काम जानेवारीत पूर्ण झाल्यावर त्वरित हे काम हाती घेतले. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा दावाही केला होता. मात्र आता आणखी एक अडचण या कामात निर्माण झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून सखल भागातील रुळांची उंची वाढवल्यामुळे एसी परावर्तनाचे काम करताना ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळांत तांत्रिक अडचण उद्भवत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत. (प्रतिनिधी)
 
मशीद, सॅण्डहस्र्ट रोड, करी रोड, परेल या ठिकाणी काम करताना रेल्वेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. 
या कामाची मंजुरी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही 
मिळणो कठीण असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. 
त्यामुळे या कामाला लेटमार्क लागण्याची शक्यता असून, अनेक जण जुलै अखेरीस, तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची सुरुवात अशी अंतिम मुदत या कामाची असल्याचे सांगत आहेत. 

 

Web Title: The confusion of DC-AC reflection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.