गोवंडीत स्फोटक पदार्थ जप्त
By Admin | Updated: October 26, 2014 00:55 IST2014-10-26T00:55:35+5:302014-10-26T00:55:35+5:30
गोवंडीत संशयास्पदरित्या आढळून आलेल्या तिघांना देवनार पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 25क् किलो स्फोटके व ज्वलनशील पदार्थ जप्त केले.

गोवंडीत स्फोटक पदार्थ जप्त
मुंबई : गोवंडीत संशयास्पदरित्या आढळून आलेल्या तिघांना देवनार पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 25क् किलो स्फोटके व ज्वलनशील पदार्थ जप्त केले.
नटवरलाल पारिख कंम्पाउडजवळील म्हाडा कॉलनीतील एका गाळ्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे उपनिरीक्षक निलेश कानडे यांनी सांगितले. फटाका किंवा स्फोटजन्य पदार्थ बनविण्यासाठी लागणा:या रासायनिक द्रव्य, पदार्थ बाळगण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.
गोवंडी येथील एका अॅटो स्पेअर पार्टची विक्रीच्या दुकानामध्ये आरोपीने हे स्फोटक पदार्थ ठेवले असल्याची माहिती वरिष्ट निरीक्षक अजिज माजर्डेकर यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपनिरीक्षक निलेश कानडे, सहाय्यक फौजदार गंगाराम मेघवाले आदींनी सहका:यांसमवेत जावून त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिघेजण रासायनिक द्रव्य तिघेजण हाताळत होते. त्यांना ताब्यात घेवून ज्वलनशील पदार्थ असलेले कॅन जप्त करण्यात आले.
दिवाळीत स्फोटजन्य पदार्थ बनविण्यासाठी हे कॅल्शियम आणण्यात आल्याची शक्यता वरिष्ठ निरीक्षक माजर्डेकर यांनी वर्तविली. याबाबत अधिक चौकशी सुरू असून जप्त करण्यात आलेले पदार्थ रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)