शिवसेनेत कॉन्फीडन्स तर मनसेमध्ये रस्सीखेच

By Admin | Updated: September 19, 2014 23:16 IST2014-09-19T23:16:57+5:302014-09-19T23:16:57+5:30

विधानसभा मतदारसंघांच्या विस्तारानंतर ठाण्यातून निर्मिती झालेला कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ पहिल्याच वेळेपासून (2क्क्9) शिवसेनेने जिंकला आहे.

Confidentiality in Shivsena and Rasikichch in MNS | शिवसेनेत कॉन्फीडन्स तर मनसेमध्ये रस्सीखेच

शिवसेनेत कॉन्फीडन्स तर मनसेमध्ये रस्सीखेच

जितेंद्र कालेकर ल्ल ठाणो
विधानसभा मतदारसंघांच्या विस्तारानंतर ठाण्यातून निर्मिती झालेला कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ पहिल्याच वेळेपासून  (2क्क्9) शिवसेनेने जिंकला आहे. युती झाली तरच भाजपने याठिकाणी लढण्याची तयारी केली आहे. अन्यथा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तर काँग्रेस आघाडीमध्येही ही जागा काँग्रेसच्या वाटयाला असली तरी राष्ट्रवादीनेही याठिकाणी लढण्याची तयारी ठेवली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेशी टक्कर देणा:या ताकदीच्या उमेदवाराच्या शोधात सर्वच पक्षाचे नेते आहेत.
नवीन निर्मिती होण्याआधीपासून कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ¨शदे हे याठिकाणी 2क्क्9 मध्ये निवडून आलेले असल्यामुळे सेनेच्या दृष्टीने हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा मानला गेला आहे.  ठाण्यातून याची निर्मिती होण्याआधीपासून आधी मोरेश्वर जोशी यांनी तीन वेळा नंतर 2क्क्4 मध्ये एक वेळा एकनाथ ¨शदे असा सलग चार पंचवार्षिकमध्ये तो शिवसेनेच्या ताब्यात होता. पुन्हा विस्तारीकरणानंतरही 2क्क्9 मधील निवडणूकीतही 73 हजार 5क्2 मते घेऊन ¨शदेंनी याठिकाणी बाजी मारली. त्यांनी काँग्रेस आघाडीच्या मनोज ¨शदेंचा 32 हजार 776 मतांनी पराभव केला. मनोज ¨शदेंना 4क् हजार 726 इतकी मते मिळाली होती. म्हणजे त्यांना शिवसेनेच्या निम्मीही मते मिळविता आली नव्हती. गेल्या 24 वर्षापासून याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. मध्यंतरी झालेल्या ठाणो महापालिकेच्या पोटनिवडणूकीतही कॉग्रेस आघाडीच्या उमेदवाराला याठिकाणी पराभव पत्करावा लागला. ती जागा भाजपने जिंकली. या पराभवामुळेच काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यातूनच काँग्रेसची ताकद ओळखून र¨वद्र फाटकांनी पुन्हा स्वगृही जाणो पत्करले आणि सात नगरसेवकांसह शिवसेनेच्या तंबूत ते दाखलही झाले. त्यामुळे आधीच सुरक्षित असलेला शिवसेनेचा हा गड आता आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. वागळे प्रभाग समितीचे सभापतीपदही काँग्रेसच्या बंडखोर मीनल संख्ये यांनी शिवसेनेच्या पाठींब्यावर मिळविले. त्यामुळे आधी पोटनिवडणूकीत पराभव नंतर फाटकांसह सात नगरसेवकांचे पक्षांतर आणि पुन्हा वागळे प्रभाग समितीचे सभापतीपदही काँग्रेसच्या हातातून गेले. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे पंख छाटण्याचे डाव शिवसेनेने यशस्वी केल्याने काँग्रेसकडून याठिकाणी आता बलाढय उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. 
जिल्हाप्रमुखांचा हा मतदारसंघ असल्यामुळे याठिकाणी शिवसेनेत तरी इतर कोणीही दावा केलेला नाही. भाजपनेही तिथे स्वारस्य दाखविलेले नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागांचा तिढा सुटलेला नसला तरी पुन्हा काँग्रेसलाच ही जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ठाणो आणि ओवळा माजीवडयाप्रमाणो येथे राष्ट्रवादीने फारसा आग्रह धरलेला नाही. गेल्या वेळी पराभूत झालेले मनोज ¨शदे आणि प्रदेश सचिव संजय चौपाने यांनी इच्छुक म्हणून मुलाखतीही दिल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक दुर्गेश प्रसाद आणि प्रमोद मोरे या दोन निरीक्षकांच्या बैठकीत या इच्छुकांनी याठिकाणी दावा केला आहे.गेल्यावेळचा पराभव फाटकांची बंडखोरी रोखता न आल्याने शिंदेंवर प्रदेशचा रोष आहेच. त्यामुळे या दोनपैकी किंवा तिसरेच नाव येण्याची शक्यता याठिकाणी आहे. राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही नसली तरी भरत चव्हाण आणि डॉ. महाले या दोघांनी याच जागेसाठी मुलाखती दिल्या आहेत. अर्थात जागा वाटपानंतरच स्वतंत्र किंवा एकत्र लढले तरी आघाडीने ताकदीचा उमेदवार दिला तरच तो शिवसेनेपुढे टिकेल.
 
मनसेत उमेदवारीसाठी रस्सीखेच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजन गावंड यांनी गेल्या वेळी याठिकाणी 35 हजार 914 ही  तिस:या क्रमांकाची मते मिळविली.महापालिकेतही तशी ताकद कमी असली तरीही मनसेमध्ये कोपरी पाचपाखाडीतून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे गावंडांसह जळगाव संपर्क अध्यक्ष आणि विद्यार्थीसेनेपासून राज ठाकरेंसोबत असलेले विनय भोईटे, माजी नगरसेवक जनार्दन खेतले, महिला शहर अध्यक्षा तेजल कदम, त्यांचे पती संजय कदम, स्मिता साळवी आणि नगरसेविका राजo्री नाईक असे आठ ते दहा जण या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. आता शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा कोपरीचा गड जिंकण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि मनसेला चांगलेच शर्थीचे प्रय} करावे लागणार आहेत.

 

Web Title: Confidentiality in Shivsena and Rasikichch in MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.