Join us  

मुंबईकरांच्या सेवेतील कंडक्टरने पैसे केले परत, प्रवासी विसरला होता १८० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 7:23 AM

Mumbai : सामाजिक प्रश्नावर काम करणारे जगदीश पाटणकर हे प्रतीक्षानगर डेपो सायन कोळीवाडा  येथील ४४८ बस क्रमांक या एसटी बसने १७ फेब्रुवारी रोजी मुंबई ते बोरीवली दरम्यान प्रवास करीत होते.

मुंबई : लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मुंबईकरांच्या प्रवासाच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या अनेक गाड्या मुंबईतील चाकरमान्यांची ने-आण करून सेवा देत आहेत. बेस्टच्या तिकीट दरानुसार आणि भरगच्च वाहतूक कोंडीतून सुखरूप प्रवास करून मुंबईकरांची सेवा करीत असतानाच मुंबईकरांच्या सेवेततील एसटी कंडक्टरच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला आहे. त्याने तिकीट फाडल्यानंतर विसरलेले १८० रुपये प्रवाशाला परत केले आहेत.सामाजिक प्रश्नावर काम करणारे जगदीश पाटणकर हे प्रतीक्षानगर डेपो सायन कोळीवाडा  येथील ४४८ बस क्रमांक या एसटी बसने १७ फेब्रुवारी रोजी मुंबई ते बोरीवली दरम्यान प्रवास करीत होते. प्रवास करत असताना याच दरम्यान त्यांनी तिकीटकरिता २०० रुपये दिले. २० रुपयेचे तिकीट घेतले. मात्र उर्वरित पैसे गाडीत गर्दी खूप असल्याने बस कंडक्टर यांना देता आले नाही. आणि प्रवासी उर्वरित पैसे मागण्यासाठीसुद्धा विसरले. काही वेळानंतर लक्षात आल्यानंतर ताबडतोब  बस टिकीट पाहून प्रतीक्षानगर डेपो येथे संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता पूर्णत: संपर्क क्रमांक बंद असल्याचे  वारंवार ऐकू येत होते. यानंतर वडाळा आणि कुलाबा येथील मुख्य कार्यालयात दिलेल्या लँडलाइन नंबरवर संपर्क साधला असता संपर्क क्षेत्राच्या  बाहेर आणि सेवा अस्तित्वात नाही. तसेच दुसऱ्या लँडलाइनवर संपर्क केला असता तास-दीड तासापासून पुढे फोन उचलत नसल्याचे दिसून आले.यानंतर स्थानिक रहिवासी यांच्या माध्यमातून प्रतीक्षानगर डेपो मॅनेजर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून  त्यानंतर त्यांनी  सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन ई-मेलद्वारा तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार प्रतीक्षानगर येथील डेपो मॅनेजर मराठे यांनी विटा सांगली एसटी महामंडळाच्या  डेपो मॅनेजर विनायक माळी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली. 

अर्जदारास केला संपर्क- कंडक्टर यांनी दिलेल्या तिकिटाच्या आधारे संबंधित एसटी बस कंडक्टरना कल्पना देऊन माहिती देण्यात आली. - एसटी अधिकारी माळी यांनी त्वरित प्रवासी अर्जदारास संपर्क साधून आपले राहिलेले पैसे चुकून राहिलेत. - ते परत देण्यात येतील याची फोनवरून खात्री दिली. शेवटी संबंधित एसटी बस कंडक्टर यांनी उर्वरित १८० रुपये परत दिले.

टॅग्स :एसटीमुंबई