कोकण विभागीय आयुक्तपदी तानाची सत्रे
By Admin | Updated: September 1, 2015 01:38 IST2015-09-01T01:38:47+5:302015-09-01T01:38:47+5:30
राज्य प्रशासनात पुन्हा फेरबदल करण्यात आले असून, तानाजी सत्रे यांना कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी आणण्यात आले आहे; तर याआधी आयुक्तपदी असलेले

कोकण विभागीय आयुक्तपदी तानाची सत्रे
मुंबई : राज्य प्रशासनात पुन्हा फेरबदल करण्यात आले असून, तानाजी सत्रे यांना कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी आणण्यात आले आहे; तर याआधी आयुक्तपदी असलेले राधेश्याम मोपलवार यांची बदली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय
संचालक या पदावर करण्यात आली आहे.
१९९३च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सत्रे हे आतापर्यंत महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. व्ही.के. कानडे यांची उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी तर व्ही.के. गौतम यांची माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. पुणे येथील मुख्यालयात महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त असलेले आर.आर. चव्हाण हे आता सिडकोचे नवे सहव्यवस्थापकीय संचालक असतील. नागपुरात मुख्यालय असलेल्या राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निरुपमा डांगे यांची बदली करण्यात आली आहे.