Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीतकार कौशल इनामदार यांना पितृशोक

By संजय घावरे | Updated: July 18, 2024 20:13 IST

श्रीकृष्ण इनामदार पुणे विद्यापीठात बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आले होते.

मुंबई : वरिष्ठ कर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयातील नियुक्त वरिष्ठ वकील ॲड. श्रीकृष्ण नरहर इनामदार म्हणजेच एस.एन. इनामदार (७९)  यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललकारी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे. संगीतकार कौशल इनामदार आणि दिग्दर्शक विशाल इनामदार यांचे ते वडील होते. 

श्रीकृष्ण इनामदार पुणे विद्यापीठात बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आले होते. तसेच शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबीमध्ये ते प्रथम आले आणि सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. ज्येष्ठ वकील वाय.पी.पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली.  

१९८४ मध्ये त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्कर फेरस लिमिटेड, किर्लोस्कर लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, सुदर्शन केमिकल लिमिटेड, सुंदरम फायनान्स लिमिटेड, बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. फिनोलेक्स ग्रुप, किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड आणि केपीटी लि. ते ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन, टीव्हीएस ग्रुप, कल्याणी ग्रुप आणि पूनावाला ग्रुपचे ते कर सल्लागार होते.

टॅग्स :मुंबईमृत्यू