पीडित मुलीची स्थिती गंभीर पण स्थिर

By Admin | Updated: March 4, 2015 02:15 IST2015-03-04T02:15:27+5:302015-03-04T02:15:27+5:30

अंधेरीतून अपहरण करून नंतर आरे कॉलनीमध्ये बलात्कार करण्यात आलेल्या पाच वर्षीय मुलीला सोमवारी रात्री परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.

The condition of the victim is serious but stable | पीडित मुलीची स्थिती गंभीर पण स्थिर

पीडित मुलीची स्थिती गंभीर पण स्थिर

मुंबई : अंधेरीतून अपहरण करून नंतर आरे कॉलनीमध्ये बलात्कार करण्यात आलेल्या पाच वर्षीय मुलीला सोमवारी रात्री परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर रात्री उशीरा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या या मुलीची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पाच वर्षांच्या या लहानगीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी सहार पोलीस आणि क्र ाइम ब्रांचचे अधिकारी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. सोमवारी रात्री या पीडित मुलीवर केईएममध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला एका विशिष्ट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरे परिसरात लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. तसेच प्रत्येक संशयित आणि विशेषत: रविवारी गैरहजर असणाऱ्या रिक्षाचालकांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या मुलीला रविवारी आरेच्या जंगलात सर्वांत आधी पाहणारे क्र ाइम ब्रांच कक्ष ९चे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वंझारे यांना तिने रिक्षावाले काका मला या ठिकाणी सोडून गेले, असे सांगितले होते. त्यानुसार आरोपी हा मुलीच्या परिचयातला असल्याचीही शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारी या मुलीचा
जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
या प्रकारामुळे या मुलीच्या
पालकांना जबर धक्का बसला
आहे. (प्रतिनिधी)

च्आरोपीला शोधण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती
च्सर्व रिक्षाचालकांची चौकशी
च्आरेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पडताळणी
च्आरोपीचे रेखाचित्र बनविण्याचे काम सुरू

Web Title: The condition of the victim is serious but stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.