हॉटेलांची स्थिती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:07 IST2020-12-22T04:07:03+5:302020-12-22T04:07:03+5:30
हॉटेलांची स्थिती चिंताजनक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून रेस्टाॅरंट आणि बार बंद होते, तर हॉटेल पाच महिने बंद होती. ऑक्टोबरमध्ये ...

हॉटेलांची स्थिती चिंताजनक
हॉटेलांची स्थिती चिंताजनक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून रेस्टाॅरंट आणि बार बंद होते, तर हॉटेल पाच महिने बंद होती. ऑक्टोबरमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण्याची सुविधा देण्यात आली. परंतु दोन महिने उलटले तरी त्याला अल्पसा प्रतिसाद आहे. आर्थिक अडचण आणि कामगारांचा तुटवडा यामुळे ३० ते ४० टक्के रेस्टाॅरंट आणि बार कायमचे बंद झाले आहेत. एकूणच या व्यवसायाची स्थिती चिंताजनक आहे.
आकडेवारी (महाराष्ट्र)
सुरू झालेली हॉटेल्स - ३० ते ४० टक्के
ग्राहकांचे प्रमाण - ८ ते १० टक्के
सुरू झालेली रेस्टॉरंट - ६० ते ७० टक्के
ग्राहकांचे प्रमाण - ३५ ते ४० टक्के
स्थलांतरित झालेले कामगार ७० टक्के
परतलेले कामगार २५ टक्के
बेरोजगार झालेले कामगार २५ टक्के
प्रमुख अडचण - कामगारांचा तुटवडा
(माहिती स्रोत - हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया)
.....
कोट
हॉटेल पूर्ण क्षमतेने तर ५० टक्के क्षमतेने रेस्टाॅरंट आणि बार सुरू आहेत. परंतु अनेक कामगार परराज्यात गेले आहेत. सरकारने रेल्वे, रस्ते वाहतुकीची व्यवस्था केली नाही, ते आले नाहीत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.
- गुरबक्षसिंह कोहली, प्रवक्ते, हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया
....