Join us  

भूतानमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी विविध सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:22 AM

भारत व भूतानमधील अधिकृत राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूतानमध्ये जाणाºया भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई : भारत व भूतानमधील अधिकृत राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूतानमध्ये जाणाºया भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. जून, जुलै, आॅगस्ट व डिसेंबरमध्ये भूतानमध्ये विविध ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.भूतानची सरकारी विमान कंपनी ड्रुक एअर व भूतान एअरलाईन्स ने जून, जुलै व आॅगस्टमध्ये भूतानमध्ये जाणाºया भारतीयांना हवाई प्रवासात ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याशिवाय भूतानमधील हॉटेल व रेस्टॉंरन्ट असोसिएशनने जुलै, आॅगस्ट व डिसेंबर मध्ये भारतीयांना हॉटेल वास्तव्यासाठी ५० टक्के सवलत जाहीर केली. या निमित्त भूतानमध्ये विविध महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भूतानमधील संस्कृती, पारंपारिक खेळांची ओळख करून दिली जाईल.

टॅग्स :भारतभूतानपर्यटन