Join us

आर्थिक अरिष्टामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 01:06 IST

ऐन दिवाळीत काम सोडण्याची नोटीस

मुंबई : आर्थिक अरिष्टामध्ये सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कंपनी व्यवस्थापनाने तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास प्रारंभ केल्याने व्यवस्थापनाची टांगती तलवार मानेवर असल्याने कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जेटच्या व्यवस्थापनाने खर्च कमी करण्यासाठी कर्मचाºयांना वेतन नसलेली रजा देण्यास प्रारंभ केला आहे, वरिष्ठ पदांवर असलेल्या व महिन्याचे वेतन लाखो रुपयांमध्ये असलेल्या अधिकाºयांना काम सोडण्याची नोटीस दिली जात असल्याने इतर कर्मचाºयांमध्येदेखील भीती पसरली आहे. अनेक कर्मचाºयांनी इतर कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यास प्रारंभ केला आहे. २८ जणांना कामावरून काढण्याची नोटीस देण्यात आली आहे.वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, इन फ्लाइट विभागाचे व्यवस्थापन पाहणारे मध्यम वर्गातील अधिकारी व केबिन क्रू अशा सर्व विभागांतील कर्मचाºयांना कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसू लागला आहे. प्रति महिना २ ते अडीच लाख, सव्वा ते दीड लाख व ७० ते ८५ हजार वेतन असलेल्या या कर्मचाºयांना अवघ्या १५ दिवसांची नोटीस देऊन काम थांबवण्याचे निर्देश देण्यात येत असल्याने जेटच्या सर्व कर्मचाºयांमध्ये भीती पसरली आहे. विशेष म्हणजे यामध्ये कायम कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाºयांसमोर ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंधार दाटला आहे.

टॅग्स :जेट एअरवेज