‘डीपी’च्या सूचना-हरकतींचे संगणकीकरण
By Admin | Updated: August 28, 2015 02:42 IST2015-08-28T02:42:50+5:302015-08-28T02:42:50+5:30
मुंबई विकास आराखड्यावर(डीपी) दाखल झालेल्या ६५ हजार सूचना आणि हरकतींचे संगणकीकरण हाती घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत

‘डीपी’च्या सूचना-हरकतींचे संगणकीकरण
मुंबई : मुंबई विकास आराखड्यावर(डीपी) दाखल झालेल्या ६५ हजार सूचना आणि हरकतींचे संगणकीकरण हाती घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत प्रशासनातर्फे देण्यात आली.
सुधार समितीच्या बैठकीदरम्यान गुरुवारी सदस्यांनी सुधारित विकास आराखड्याचे काम किती झाले असून, त्यात काय काय सुधारणा करण्यात आल्या आहेत? याचा आढावा प्रशासनाकडे मागितला. या वेळी प्रशासनाने दिलेल्या आढाव्यानुसार, मुंबईच्या विकास आराखड्यावर दाखल झालेल्या ६५ हजार सूचना व हरकतींचे संगणकीयकरण हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवाय सुधारित विकास आराखड्याच्या कामादरम्यान धोरणात्मक बाबींची शहानिशा
सुरू असून, आराखड्यातील
मुद्द्यांच्या विश्लेषणाचे काम सुरू आहे. तसेच वॉर्डनुसार, रस्त्यांची पाहणीदेखील सुरू करण्यात आली आहे. शिवाय रस्त्यांचे निरीक्षणही करण्यात येणार आहे. सुधारित विकास आराखड्यातील धोरणात्मक बाबींवर चर्चा सुरू असून, सूचना आणि हरकतींच्या विभागणीचे कामही सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)